ढाका - बांगलादेश विरोधातील एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमान बांगलादेशचा २२४ धावांनी पराभव केला. या विजयासह अफगाणिस्तानने मालिका जिंकली आहे. ११ गडी बाद करणाऱ्या राशिद खान याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
Cricket Record : एकदिवसीय इतिहासात टीम इंडियाने उभारलेली 'टॉप ५' सर्वोच्च धावसंख्या
बांगलादेशच्या चित्तगावच्या जहूर अहेमद चौधरी मैदानात रंगलेल्या सामन्यात राशिद खान याच्या नेतृत्वात अफगाणिस्तानने विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर अफगाणिस्तान संघाचा हा दुसरा विजय आहे. अफगाणिस्तान संघाने भारत, आयरलँड आणि आता बांगलादेश या विरोधात एकूण ३ सामने खेळली आहेत. यामध्ये अफगाणिस्तानने भारत वगळता आयरलँड आणि बांगलादेश या दोन्ही संघाचा पराभव केला आहे.
..असा विक्रम करणारा राशिद खान पहिलाच कर्णधार
अफगाणिस्तानने बांगलादेशला ३९८ धावांचे आव्हान दिले होते. मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानच्या फिरकीसमोर बांगलादेशचा संघ २०५ धावांवर आटोपला. राशिद खानने पहिल्या डावात ५ आणि दुसऱ्या डावात ६ असे एकूण ११ गडी बाद केले.
दरम्यान, चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची अवस्था ६ गडी बाद १३६ अशी होती. मात्र अखेरच्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे हा सामना अणिर्यित राहिल असे वाटत होते. परंतु, पावसाने उघड दिली आणि सामना सुरू झाला. राशिद खानच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या खेळाडूंनी २०५ धावांवर गुडघे टेकले. दरम्यान, या कसोटीत बांगलादेशचा कर्णधार साकिब अल हसन आणि संघ व्यवस्थापनाने एकही जलदगती गोलंदाजाशिवाय उतरणे पसंद केले होते.