ETV Bharat / sports

'बाप, बाप होता है'; पाकचा हा मुख्य फलंदाज म्हणतोय, कोहलीला पाहून शिकतोय फलंदाजी

आयसीसी विश्वचषक स्पर्धेत क्रिकेट जगतातील पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान आणि भारत १६ जूनला मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफॉर्ड क्रिकेट स्टेडियमवर समोरासमोर येणार आहेत.

'बाप, बाप होता है'; पाकचा हा मुख्य फलंदाज म्हणतोय, कोहलीला पाहून शिकतोय फलंदाजी
author img

By

Published : Jun 15, 2019, 3:43 PM IST

मँचेस्टर - विश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ उद्या आमने सामने येणार आहेत. त्यापूर्वी शुक्रवारी पाक संघातील मुख्य फलंदाजांपैकी एक असलेल्या बाबर आझमने विराट कोहलीला पाहून आपण फलंदाजी शिकतोय असे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना बाबरने सांगितले की, भारतीय कर्णधार कोहलीची फलंदाजी पाहून मी आपला खेळ सुधारण्याचा प्रयत्न करत असतो. विराट वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतो हे पाहून, मी माझ्या फलंदाजीत योग्य तो बदल करतो असेही बाबर म्हणाला.

बाबर आझम आणि विराट कोहली
बाबर आझम आणि विराट कोहली

पुढे बोलताना बाबर म्हणाला, 'चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आमच्या संघाने भारतावर मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास वाढला असून तो विजय आमच्या आठवणीतून कधीच जाणार नाही. भारतीय संघाकडे दमदार गोलंदाजांचा भरणा आहे मात्र, आमच्या संघातील फलंदाज भारताविरुद्ध चांगली कामगिरी करतील अशी मला खात्री आहे.'

यापूर्वी पाकचा माजी कर्णधार युनूस खान एका कार्यक्रमात बोलताना म्हणाला होता की, 'विराट कोहली हा पाकच्या युवा खेळाडूंसाठी एक आदर्श खेळाडू आहे. तसेच अनेक पाक खेळाडू हे भारतीय कर्णधार कोहलीची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतात. विराटला पाकिस्तानमध्ये खूप पसंद केले जात असून तो एक लोकप्रिय खेळाडू आहे.'

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.