ETV Bharat / sports

विराट आणि माझी तुलना होऊ शकत नाही - बाबर आझम

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाबरने स्थानिक माध्यमांना सांगितले, "मला वाटते की विराट कोहलीशी माझी तुलना करू नये, तो वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे आणि मी वेगळ्या प्रकारचा आहे. माझे काम माझ्या संघासाठी सामने जिंकणे असून मी त्याकडे लक्ष देईन. "

babar azam said virat kohli and me are different type of players
विराट आणि माझी तुलना होऊ शकत नाही - बाबर आझम
author img

By

Published : May 19, 2020, 3:08 PM IST

कराची - माझी आणि विराट कोहलीची तुलना करणे चुकीचे असल्याचे मत पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बाबर आझमने दिले आहे. बाबर हा एकदिवसीय क्रमवारीत तिसर्‍या तर कोहली पहिल्या क्रमांकावर आहे. टी-20 क्रमवारीत बाबर अव्वल तर कोहली दहाव्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर कसोटी क्रमवारीत कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे तर बाबर पाचव्या क्रमांकावर आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बाबरने स्थानिक माध्यमांना सांगितले, "मला वाटते की विराट कोहलीशी माझी तुलना करू नये, तो वेगळ्या प्रकारचा खेळाडू आहे आणि मी वेगळ्या प्रकारचा आहे. माझे काम माझ्या संघासाठी सामने जिंकणे असून मी त्याकडे लक्ष देईन. "

कर्णधारपदाबद्दल विचारले असता बाबर म्हणाला, ''मी मैदानावर माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा कायम प्रयत्न करेन. कर्णधार म्हणून तुम्हाला शांत राहण्याची गरज असते. तुम्हाला राग येईल, परंतु त्यावेळी आपल्याला भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. मैदानावर तुम्हाला स्वत:च्या आक्रमकपणावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. मी खेळाडूंना नेहमी साथ देईन आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करेन.'' काश्मीर प्रश्नावर शाहिद आफ्रिदीने केलेल्या विधानावर बोलण्यास बाबरने नकार दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.