साऊथम्प्टन - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या जाणार्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीने मोठी कामगिरी केली आहे. अझरने कसोटीत ६००० धावांचा टप्पा पूर्ण केला. या कसोटीत ४३ धावा करत त्याने हा टप्पा पार केला.
-
6⃣0⃣0⃣0⃣ Test runs for @AzharAli_ 👏#ENGvPAK pic.twitter.com/euJfNndNad
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">6⃣0⃣0⃣0⃣ Test runs for @AzharAli_ 👏#ENGvPAK pic.twitter.com/euJfNndNad
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 20206⃣0⃣0⃣0⃣ Test runs for @AzharAli_ 👏#ENGvPAK pic.twitter.com/euJfNndNad
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2020
अशी कामगिरी करणारा अझर अली हा पाचवा पाकिस्तानी फलंदाज ठरला आहे. अझर अलीच्या शानदार नाबाद शतकी खेळीनंतरही पाकिस्तानला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीच्या तिसर्या दिवशी फॉलोऑनला सामोरे जावे लागले. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात २७३ धावा करू शकला. इंग्लंडकडे अद्याप ३१० धावांची आघाडी आहे.
या कसोटीत अझर अलीने २१ चौकारांच्या मदतीने २७२ चेंडूत नाबाद १४१ धावा फटकावल्या. याशिवाय त्याने सहाव्या विकेटसाठी मोहम्मद रिझवानसोबत (५३) १३८ धावांची भागीदारी रचली. मात्र, या दोघांशिवाय कोणताही फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर उभा राहू शकला नाही.
६००० धावांचा पल्ला ओलांडणारे पाक फलंदाज -
- यूनिस खान- १००९९ धावा
- जावेद मियांदाद- ८८३२ धावा
- इंजमाम उल हक- ८८३० धावा
- मोहम्मद यूसुफ- ७५३० धावा
- अझर अली- ६०००* धावा