ETV Bharat / sports

चेंडूला सॅनिटायझर लावल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे निलंबन; ३ गडी केले होते बाद - ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिच क्लाडॉन न्यूज

इंग्लंडमध्ये बॉब विलिस ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिच क्लाडॉन ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो. त्याने एका सामन्यात चेंडूला चमकवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचा वापर केला. त्यामुळे क्लबने त्याचे निलंबन करत बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

Australian Pacer Mitch Claydon Suspended For Applying 'Hand Sanitiser' To Ball
चेंडूला सॅनिटायझर लावल्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे निलंबन; ३ गडी केले बाद
author img

By

Published : Sep 6, 2020, 12:51 PM IST

लंडन - कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे आयसीसीने खेळाडूसाठी कडक नियमावली तयार केली आहे. यात चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या दरम्यान, चेंडूला सॅनिटायझर लावल्याने, एका ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे निलंबन करण्यात आले आहे.

गोलंदाज कोरोनाच्या आधी चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा घामाचा वापर करत असतं. पण कोरोनाच्या धोक्यामुळं आयसीसीने लाळ किंवा घाम याचा वापर करण्यास मज्जाव केला आहे.

इंग्लंडमध्ये बॉब विलिस ट्रॉफी खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिच क्लाडॉन ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो. त्याने एका सामन्यात चेंडूला चमकवण्यासाठी हॅन्ड सॅनिटायझरचा वापर केला. त्यामुळे क्लबने त्याचं निलंबन करत बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

इंग्लंड वेल्स क्रिकेट बोर्डानं, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ससेक्स क्लबनं आपल्या संकेतस्थळावरुन जाहीर केले की, ईसीबीचा तपास पूर्ण होईपर्यंत मिच क्लाडॉनचे निलंबन केले जात आहे. दरम्यान, या सामन्यात ३७ वर्षीय मिच क्लॉडने तीन गडी बाद केले होते.

हेही वाचा - IPL 2020 : 'या' सात खेळाडूंनी घेतली माघार, त्याच्या जागेवर कोण खेळणार, जाणून घ्या...

हेही वाचा - क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा संपली...'या' दिवशी होणार IPL 2020 चे वेळापत्रक जाहीर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.