दुबई - पाकिस्तानविरुद्ध खेळल्या पाचव्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने २० धावांनी विजय मिळवला. या विजयासह कांगारुंनी ५ सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानचा ५-० ने धुव्वा उडवला आहे. हा विजय ऑस्ट्रेलियाचा वनडेमध्ये सलग आठवा विजय ठरला आहे.
It’s a whitewash! Australia will take an eight-match winning streak into the World Cup after securing a historic 5-0 series sweep over Pakistan. SCORES: https://t.co/BKdrwno2ff pic.twitter.com/GZ0OvfPWdb
— cricket.com.au (@cricketcomau) March 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">It’s a whitewash! Australia will take an eight-match winning streak into the World Cup after securing a historic 5-0 series sweep over Pakistan. SCORES: https://t.co/BKdrwno2ff pic.twitter.com/GZ0OvfPWdb
— cricket.com.au (@cricketcomau) March 31, 2019It’s a whitewash! Australia will take an eight-match winning streak into the World Cup after securing a historic 5-0 series sweep over Pakistan. SCORES: https://t.co/BKdrwno2ff pic.twitter.com/GZ0OvfPWdb
— cricket.com.au (@cricketcomau) March 31, 2019
दुबईत खेळण्यात आलेल्या या साममन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाला फलंदाजीस पाचारण केले. ऑस्ट्रेलियालाने निर्धारीत ५० षटकांमध्ये ७ गडी गमावत ३२७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून सलामी फलंदाज उस्मान ख्वाजाने ९८ तर अॅरोन फिंचने ५३ धावांची खेळी केली. तर शॉन मार्शने ६१ आणि ग्लेन मॅक्सवेलने ७० धावा करत संघाची धावसंख्या तीनशेपार पोहचवले.
आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर अबिद अली शून्यावर माघारी परतल्यानंतर शान मसूदने ५० धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर आलेल्या हॅरीस सोहेलने १३० धावा केल्या. पाकचे तळाचे फलंदाज अकमल (४३) आणि कर्णधार वसीमने ५० धावा करत पाकच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र, धावा आणि चेंडू यांच्यातील फरक इतके वाढले की पाकला ३०७ धावा करत्या आल्याने त्यांचा२० धावांनी पराभव झाला. या सामन्यातमॅक्सवेलला सामनावीर तर फिंचला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.