लंडन - लॉर्ड्स मैदानावर अॅशेस मालिकेतील दुसरा करोटी सामना रंगला आहे. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावामध्ये सर्वबाद २५८ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद १०२ झाली. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टीव स्मिथने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तो फलंदाजी करत असताना जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा एक चेंडू थेट त्याच्या मानेवर आदळला. त्यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले.
-
Archer to Smith. Ouch. pic.twitter.com/IpdKCaBVxI
— Paul Jones (@pauljones1981) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Archer to Smith. Ouch. pic.twitter.com/IpdKCaBVxI
— Paul Jones (@pauljones1981) August 17, 2019Archer to Smith. Ouch. pic.twitter.com/IpdKCaBVxI
— Paul Jones (@pauljones1981) August 17, 2019
नेमके काय घडले -
दिवसाच्या दुसऱ्या सत्रात स्मिथ १५२ चेंडूत ८० धावांवर खेळत होता. तेव्हा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर ७७ वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकातील दुसरा चेंडू त्याने बाउंसर टाकला. हा चेंडू स्मिथच्या हेल्मेटच्या उजव्या बाजूला त्याच्या मानेच्या जवळ लागला. त्यामुळे स्मिथ वेदनेने मैदानातच कोसळला.
-
Two sensational talents
— England Cricket (@englandcricket) August 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
One incredible #Ashes contest
Our best wishes are with Steve Smith pic.twitter.com/BRlLrqR7Hm
">Two sensational talents
— England Cricket (@englandcricket) August 17, 2019
One incredible #Ashes contest
Our best wishes are with Steve Smith pic.twitter.com/BRlLrqR7HmTwo sensational talents
— England Cricket (@englandcricket) August 17, 2019
One incredible #Ashes contest
Our best wishes are with Steve Smith pic.twitter.com/BRlLrqR7Hm
तेव्हा वैद्यकीय टीम मैदानावर आली. त्यांनी तपासणी केली. त्यानंतर स्मिथला मैदानाबाहेर जावे लागले. स्मिथ मैदानाबाहेर जात असताना मैदानातील प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्याच्या फलंदाजीला दाद दिली.
दरम्यान, २५ नोव्हेंबर २०१४ साली ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिल ह्यूज याच्या डोक्याला चेंडू लागून दुर्दैवी मृत्यू झाला होता.
काही वेळानंतर स्मिथ पुन्हा मैदानात उतरला. त्याने आणखी ९ चेंडूत १२ धावांची भर घालत तो व्यक्तीगत ९२ धावांवर बाद झाला. इंग्लंडच्या २५८ धावांच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २५० धावांवर आटोपला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दुसऱ्या डावात इंग्लंडची अवस्था ४ बाद ९६ अशी झाली आहे. इंग्लंडने एकूण १०४ धावांची आघाडी घेतली असून आज सामन्याचा शेवटचा दिवस आहे.