ओव्हल - बंदीची शिक्षा भोगलेल्या डेव्हिड वॉर्नरने टीकाकारांची तोंडे बंद करत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात दमदार शतक झळकावले. आपल्या ३३ व्या वाढदिवशी वॉर्नरने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे २० षटकांत ऑस्ट्रेलियाने लंकेसमोर २३३ धावांचा डोंगर रचला. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेला शंभर धावाही करता आल्या नाहीत.
-
GAME OVER!
— cricket.com.au (@cricketcomau) October 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Australia beat Sri Lanka by a comprehensive 134 runs to begin their summer in style. #AUSvSL pic.twitter.com/3wwKMNWWaM
">GAME OVER!
— cricket.com.au (@cricketcomau) October 27, 2019
Australia beat Sri Lanka by a comprehensive 134 runs to begin their summer in style. #AUSvSL pic.twitter.com/3wwKMNWWaMGAME OVER!
— cricket.com.au (@cricketcomau) October 27, 2019
Australia beat Sri Lanka by a comprehensive 134 runs to begin their summer in style. #AUSvSL pic.twitter.com/3wwKMNWWaM
हेही वाचा - टेनिसच्या महानायकाने साजरा केला ५० वा विजय, गाठली अंतिम फेरी
अॅडलेड ओव्हल येथे रंगललेल्या या सामन्यात कांगारूंनी लंकेवर १३४ धावांनी मात केली. ऑस्ट्रेलियाच्या २३३ धावांचा पाठलाग करताना लंकेचा संघ २० षटकांत ९९ धावाच करू शकला. या धावांमध्ये त्यानी ९ फलंदाज गमावले. या फलंदाजांपैकी एकाही फलंदाजाला वीस धावांचा आकडा गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पाने ३, मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी २ तर, अॅश्टन अगरने १ बळी मिळवला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून लंकेने कांगारूना फलंदाजीला पाचारण केले. या संधीचे सोने करत फिंच आणि वॉर्नरने लंकेच्या गोलंदाजांची पिसे काढली. या सामन्यात वॉर्नर आणि स्मिथ यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर हे दोघे प्रथमच आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या संघात कमबॅक केले. वॉर्नरला अॅशेस मालिकेत अपयश आले असले तरी त्याने टी-२० मध्ये दमदार कमबॅक केले. वॉर्नरने ५६ चेंडूंत १० चौकार व ४ षटकार खेचून नाबाद १०० धावा ठोकल्या. तर, शेवटी आलेल्या मॅक्सवेलने आपल्या नेहमीच्या शैलीत फलंदाजी करताना २८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६२ धावा कुटल्या. लंकेकडून कसून रंजिताने ४ षटकांत ७५ धावा दिल्या आहेत.