पर्थ - ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ शानदार फलंदाजी तर करतोच, त्यासोबत तो उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही आहे. त्याने पर्थ येथे रंगलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात अप्रतिम झेल टिपत क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नजराणा पेश केला.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव, दुसऱ्या दिवशी मार्नस लॅब्युशेनच्या १४३ धावांच्या खेळीच्या जोरावर ४१६ धावांवर आटोपला. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडची पहिल्या डावात सुरुवात खराब झाली. किवीचे ५ फलंदाज अवघ्या १०० धावात माघारी परतले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर किवीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. पहिल्या डावात स्टिव्ह स्मिथने शानदार क्षेत्ररक्षण करताना एक अप्रतिम झेल घेतला. स्मिथने घेतलेल्या या झेलची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.
-
STEVE SMITH!
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
It doesn't get any better than that! #AUSvNZ pic.twitter.com/fxMje4Ms7I
">STEVE SMITH!
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2019
It doesn't get any better than that! #AUSvNZ pic.twitter.com/fxMje4Ms7ISTEVE SMITH!
— cricket.com.au (@cricketcomau) December 13, 2019
It doesn't get any better than that! #AUSvNZ pic.twitter.com/fxMje4Ms7I
न्यूझीलंडच्या फलंदाजीदरम्यान, २३ व्या षटकात मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला. या षटकातील चौथा चेंडू किवीचा कर्णधार केन विल्यमसनने चेंडू स्लिपमध्ये 'कट' केला. तेव्हा स्लिपमध्ये उभारलेल्या स्मिथने हवेत सूर मारून झेल टिपला. स्मिथने घेतलेला झेल पाहून विल्यम्सनही चक्रावला. बाद झाल्यानंतर काही वेळ तो मैदानावरच उभा होता. स्मिथने घेतलेल्या या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा - आयपीएल 2020 हंगामासाठी 332 खेळाडूंवर लागणार बोली; 19 डिसेंबरला लिलाव
हेही वाचा - AUSvNZ : पर्थ कसोटीत टीम साऊथीचे आक्रमक रूप, जो बर्न्सला फेकून मारला चेंडू