मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने या मालिकांसाठी आपला संघ जाहीर केला आहे. अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचे संघात पुनरागमन झाले आहे.
ग्लेन मॅक्सवेलने बिग बॅश लीग २०१९-२० या हंगामामध्ये आतापर्यंत ३८९ धावा जमवल्या आहेत. तसेच त्याने गोलंदाजीत ८ बळी मिळवले आहेत. मॅक्सवेलने आपले मानसिक संतुलन ठीक नसल्याचे सांगत क्रिकेटपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. ब्रेकनंतर त्याने बिग बॅशच्या रुपाने क्रिकेटमध्ये यशस्वी पुनरागमन केले.
ऑस्ट्रेलिया निवड समितीचे ट्रेवर हॉन्स यांनी सांगितले की, 'बिग बॅश लीगमध्ये मॅक्सवेल फलंदाजीसह गोलंदाजीत यशस्वी ठरला आहे. त्याची संघात वापसी झाली असून त्याच्या येण्याने मधली फळी मजबूत झाली आहे.'
दरम्यान, बिग बॅश लीगमध्ये १५ सामन्यात सर्वाधिक ६१२ धावा करणारा मार्नस स्टोनिस संभाव्य संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला.
- असा आहे ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय संघ -
अॅरोन फिंच ( कर्णधार ), एश्टन एगर, अॅलेक्स केरी ( उपकर्णधार ), पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झंम्पा. - असा आहे ऑस्ट्रेलियाचा टी-२० संघ -
अॅरोन फिंच ( कर्णधार ), शॉन अॅबॉट, एश्टन एगर, अॅलेक्स केरी ( उपकर्णधार ), पॅट कमिन्स, मिशेल मार्श, ग्लेन मँक्सवेल, झे रिचर्डसन, केन रिचर्डसन, स्टिव स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झंम्पा.
IND vs NZ : टीम इंडिया नव्या सलामीवीर जोडीसह मैदानात, विराटने दिले संकेत