नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघ पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार असल्याचे जाहीर केले. हा सामना भारत-बांगलादेश संघात ईडन गार्डन्स मैदानावर २२ नोव्हेंबर पासून रंगणार आहे. बीसीसीआयने गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र सामना खेळण्यासाठी वारंवार नकार दिला होता. मात्र, गांगुलींनी पदभार स्वीकारताच भारतीय संघाने या सामन्यासाठी होकार दर्शवला आहे. वाचा आतापर्यंत किती संघानी खेळला आहे, दिवस-रात्र कसोटी सामने...
- पहिला दिवस-रात्र कसोटी सामना ४ वर्षांपूर्वी २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ३ गडी राखून विजय मिळवला होता.
- आजघडीपर्यंत क्रिकेट इतिहासात ११ दिवस-रात्र कसोटी सामने झाली आहेत. यात सर्वाधिक ऑस्ट्रेलियाने ५ सामने खेळले आहेत. महत्वाचे म्हणजे, ऑस्ट्रेलियाने ५ हे सामने मायदेशात खेळली असून या पाचही सामन्यात विजय मिळवला आहे.
- भारत, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान वगळता सगळ्या संघानी दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. २०१९ मध्ये भारत-बांग्लादेश सामना वगळता ३ दिवस-रात्र सामने खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा ः शाकिबचे निलंबन..! भारत दौऱ्यासाठी बांगलादेश संघाचे कर्णधारपद 'यांच्या'कडे
हेही वाचा ः पहिला दिवस-रात्र कसोटी सामना : तिकिटाचे दर पाहून तुम्हीही म्हणाल इतकं स्वस्त कसं