अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथने अॅडलेड कसोटीत खेळताना एक अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने कसोटीत सर्वात जलद ७ हजार धावांचा टप्पा गाठण्याचा विक्रम आपल्या नावे केला. स्टिव्ह स्मिथने ७० कसोटी सामन्यात १२६ डावांमध्ये खेळताना ७ हजारी पार केली. यापूर्वी १९४६ साली इंग्लंडच्या वाल्टर हॅमोंड यांनी १३१ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
-
Another record broken for the outstanding Steve Smith! @Domaincomau | #AUSvPAK pic.twitter.com/pjmEKY7BKk
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Another record broken for the outstanding Steve Smith! @Domaincomau | #AUSvPAK pic.twitter.com/pjmEKY7BKk
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2019Another record broken for the outstanding Steve Smith! @Domaincomau | #AUSvPAK pic.twitter.com/pjmEKY7BKk
— cricket.com.au (@cricketcomau) November 30, 2019
सर्वात जलद ७ हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्मिथने सचिन तेंडुलकर, विराट कोहली विरेंद्र सेहवाग यांना मागे टाकले आहे. पाकिस्तान विरुध्दच्या दुसऱ्या सामन्याआधी स्मिथने ६९७७ धावा केल्या होत्या. त्याला ७ हजार धावा पूर्ण करण्यासाठी २३ धावांची गरज होती. या धावा त्याने डेव्हिड वॉर्नरसोबतीने जमवल्या आणि अनोख्या विक्रमाला गवसणी घातली.
दरम्यान, विरेंद्र सेहवागने १३४ डावात खेळताना ७ हजार धावांचा टप्पा पार केला होता. तर सचिनने १३६ डावात आणि विराटने १३८ डावात सात हजारी पार केली आहे.
कसोटीत सर्वात कमी डावांमध्ये ७ हजार धावांचा टप्पा गाठणारे फलंदाज –
- स्टिव्ह स्मिथ – १२६
- वाल्टर हॅमोंड – १३१
- विरेंद्र सेहवाग – १३४
- सचिन तेंडुलकर – १३६
- विराट कोहली – १३८
- गॅरी सोबर्स – १३८
- कुमार संगकारा – १३८