ETV Bharat / sports

AUS VS IND : ठरलं.., तिसरा कसोटी सामना सिडनीमध्येच होणार - भारत वि. ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना न्यूज

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्येच खेळवला जाणार असल्याची घोषणा केली आहे.

AUS vs IND : Sydney to host third Test despite COVID-19 fears
AUS VS IND : ठरलं.., तिसरा कसोटी सामना सिडनीमध्येच होणार
author img

By

Published : Dec 29, 2020, 7:55 PM IST

सिडनी - क्रिकेट ऑस्ट्रेलियाने, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना सिडनीमध्येच खेळवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, सिडनीसह परिसरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. यामुळे हा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असल्याची चर्चा होती. या संदर्भातील संकेत खुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. पण आता हा सामना सिडनीमध्येच होणार, हे स्पष्ट झाले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेत रंगत वाढली आहे.

ख्रिसमसच्या आधी, सिडनीच्या उत्तर भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. यामुळे सिडनी सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा सामना नियोजित सिडनीमध्येच होईल, असे जाहीर केले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले यांनी सांगितले की, 'कोरोना महामारीच्या काळात अनेक संकटे असताना, आम्हाला सांगण्यास आनंद होतो की, क्रिकेट ऑस्ट्रेलिया ही मालिका नियोजित ठिकाणी खेळवण्याच्या वाटेवर आहे. आम्ही तिसरा सामना नियोजित सिडनीमध्येच आयोजित करणार आहोत. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही सिडनी आणि ब्रिस्बेन येथील चौथा सामना सुरक्षित आणि यशस्वीपणे खेळवू.'

तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का?

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्मा तिसऱ्या कसोटीत खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत. दुसरा सामना संपल्यानंतर व्हर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की, 'भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील पाच गोलंदाजासह मैदानात उतरणार आहे. बुधवारी रोहित शर्मा संघासोबत जोडला जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रोहित क्वारंटाइनमध्ये आहे. संघात स्थान देण्यापूर्वी रोहित शर्मासोबत चर्चा करण्यात येईल. त्यानंतर संघाची निवड करण्यात येईल.'

हेही वाचा - वेलडन अजिंक्य...' सचिन, विराट, अमिताभसह इतरांनी केलं टीम इंडियाचे कौतुक

हेही वाचा - तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार का? शास्त्री गुरुजींनीं दिले 'हे' संकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.