मेलबर्न - ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळत असलेल्या भारतीय संघाला एक मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला दुखापत झाली असून यामुळे तो कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. याची माहिती बीसीसीआयने दिली.
-
UPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy.
— BCCI (@BCCI) January 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details 👉 https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2L
">UPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy.
— BCCI (@BCCI) January 5, 2021
More details 👉 https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2LUPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy.
— BCCI (@BCCI) January 5, 2021
More details 👉 https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2L
बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, एमसीजी मैदानावर भारतीय संघाने शनिवारी सराव केला. या सराव सत्रात नेटमध्ये फलंदाजीदरम्यान, केएल राहुलच्या हाताला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असून तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित दोन्ही कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी तीन आठवड्याचा वेळ लागू शकतो.
दुखापत झाल्याने, राहुल भारतात परतणार आहे. तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये डॉक्टरांच्या निगराणीत उपचार घेईल, असे देखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, केएल राहुलला पहिल्या दोन कसोटी सामन्यात अंतिम संघात स्थान मिळालेले नव्हते.
मालिका बरोबरीत -
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्याची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील अॅडलेड येथील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला. त्यानंतर मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने त्या पराभवाची परतफेड केली. भारताने हा सामना ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. उभय संघातील तिसरा सामन्याला ७ जानेवारीपासून सिडनीमध्ये सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - श्रीलंकेत पोहोचला इंग्लंडचा संघ... मोईन अलीला झाली कोरोनाची लागण
हेही वाचा - पाकिस्तानच्या माजी कर्णधाराला कोरोनाची लागण