मेलबर्न - भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान खेळल्या जाणार्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) दररोज ३०,००० प्रेक्षक सामना पाहण्यास सक्षम असतील. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील हा दुसरा कसोटी सामना असेल.
हेही वाचा - तब्बल १४ वर्षांनंतर आफ्रिकेचा संघ करणार पाकिस्तान दौरा!
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) ट्विट केले की, "आम्ही एमसीजीत खूप प्रेक्षकांचे स्वागत करण्यास तयार आहोत. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यांची संख्या दररोज ३०,००० प्रेक्षकांपर्यंत वाढली आहे." यापूर्वी सीएने कोरोनामुळे दररोज एमसीजीची प्रेक्षकांची मर्यादा २५,००० निश्चित केली होती.
पहिल्या आणि तिसऱ्या कसोटीतही प्रेक्षक -
अॅडलेड ओव्हल मैदानावर खेळल्या जाणार्या पहिल्या कसोटी सामन्यात, स्टेडियममधील एकूण क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना दररोज स्टेडियमवर येण्याची परवानगी दिली जाईल. तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट मैदानावर (एससीजी) खेळला जाईल. या स्टेडियममध्येही ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी आहे. हा सामना ३ ते ७ जानेवारी २०२१ दरम्यान खेळला जाईल.
चौथा कसोटी सामना १५ ते १९ जानेवारी दरम्यान ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळला जाईल. या स्टेडियमवर दिवसाला ३०,००० प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल.