मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे कमावणारा खेळाडू आहे. तसेच त्याला बीसीसीआयच्या करारामधून दरवर्षी कोट्यवधी रुपये मिळतात. याशिवाय तो जाहिरातीतून प्रचंड कमाई करतो. असे असताना देखील विराट कोहलीच्या घरात कामासाठी एकही नोकर नाही. होय, हे खरं आहे. याची माहिती भारतीय संघाचे माजी निवडकर्ते सरनदीप सिंह यांनी दिली.
एका मुलाखतीदरम्यान सरनदीप सिंह यांनी सांगितले की, 'विराट पत्नी अनुष्कासह मुंबईत राहतो. त्यांच्या घरी एकही नोकर नाही. जेव्हा विराटच्या घरी पाहुणे येतात. तेव्हा विराट आणि त्याची पत्नी अनुष्का हे दोघे सर्व कामे करतात. तसेच ते पाहुण्यांना जेवण वाढतात.'
विराट आपल्या संघातील खेळाडूंचा नेहमी आदर करतो. तो एका चांगला माणूस आहे, असे देखील सिंह यांनी सांगितलं.
विराट कोहलीच्या मैदानातील स्वभावाबद्दल सिंह यांनी सांगितलं की, 'क्रिकेटच्या मैदानात विराट आक्रमक राहतो. त्याला तसे राहावेच लागते. कारण तो कर्णधार आहे. त्याच्यावर नेहमी प्रेशर असते. अशा स्थितीत त्याला कठीण निर्णय घ्यावे लागतात'
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच विराट-अनुष्का या सेलिब्रिटी जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झालं आहे. त्या दोघांनी त्यांच्या मुलीचं नाव 'वामिका' असे ठेवले आहे.
हेही वाचा - ख्रिस मॉरिस नव्हे तर विराट आहे आयपीएलचा महागडा खेळाडू
हेही वाचा - ''...खून करू नका'', फरहान अख्तरचे अर्जुनविषयीचे ट्विट व्हायरल!