लीड्स- हेडिंग्ले मैदानावर खेळल्या जाणाऱ्या इंग्लड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. दिवस अखेर इंग्लडची 3 बाद 156 धावा अशी स्थिती आहे. जो रुटने केलेल्या नाबाद 75 धावांच्या जोरावर इंग्लंडने सामन्यावरील वर्चस्व राखलं आहे. इंग्लडला सामना जिंकण्यासाठी आणखी 203 धावांची आवश्यकता असून जो रुट मैदानात टिकून आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 246 धावा करत इंग्लडसमोर 359 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना इंग्लडची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या 15 धावांमध्ये रोरी बर्न्स (7) आणि जेसन रॉय (8) बाद झाले होते. त्यानंतर जो रुट( नाबाद 75) आणि जो डेनली (50) यांनी 126 धावांची भागिदारी करत आव्हान कायम ठेवले. दिवस अखेर जो रुट(नाबाद 75) आणि बेन स्टोक्स (नाबाद 2) खेळत होते.