लंडन - ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथने इंग्लंड विरुध्द अॅशेस मालिकेत दणकेबाज फलंदाजी केली आहे. स्टीव्ह स्मिथने या मालिकेत आतापर्यंत ७०० पार धावा केल्या आहेत. त्यांच्या या अफलातून फलंदाजीचे कौतूक तर क्रिकेट विश्वातून होतच आहे. पण, आता तो अप्रतिम झेल पकडल्याने प्रकाशझोतात आला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये अॅशेस मालिकेतील शेवटचा पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात स्टीव्ह स्मिथने एका हाताने अप्रतिम झेल घेतला. स्मिथने घेतलेला झेल पाहून इंग्लंडचा फलंदाज ख्रिस वोक्स तर आर्श्चयचकित झालाच मात्र, त्यासोबत ऑस्ट्रेलियाचे इतर खेळाडूही स्मिथने पकडलेला झेल पाहून दंग झाले.
हेही वाचा - अॅशेस मालिका - डेन्लीचे शतक हुकले, तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडकडे ३८२ धावांची आघाडी
दरम्यान, घडले असे की, इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करत होता. तेव्हा ८७ वे षटक घेऊन मिशेल मार्श गोलंदाजी करण्यासाठी आला तेव्हा समोर ख्रिस वोक्स ६ धावांवर फलंदाजी करत होता. वोक्सला मार्शने टाकलेला चेंडू कळला नाही आणि वोक्सच्या बॅटचा स्पर्श घेऊन तो चेंडू हवेत उडाला.
-
Great catches from the Aussies tbf
— England Cricket (@englandcricket) September 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard/Videos: https://t.co/L5LXhA6aUm#Ashes pic.twitter.com/tT9Lc2pnBt
">Great catches from the Aussies tbf
— England Cricket (@englandcricket) September 14, 2019
Scorecard/Videos: https://t.co/L5LXhA6aUm#Ashes pic.twitter.com/tT9Lc2pnBtGreat catches from the Aussies tbf
— England Cricket (@englandcricket) September 14, 2019
Scorecard/Videos: https://t.co/L5LXhA6aUm#Ashes pic.twitter.com/tT9Lc2pnBt
हेही वाचा - टी-20 क्रिकेटमधे नवीन करिश्मा; 'या' दोन फलंदाजांनी सलग 7 चेंडूत ठोकले 7 षटकार
तेव्हा उडालेला चेंडू स्मिथने हवेत उडी घेत अलगद झेलला. स्मिथने घेतलेल्या या अप्रतिम झेलने इंग्लंडला सातवा धक्का वोक्सच्या रुपाने बसला. दरम्यान, स्टीव्ह स्मिथने या मालिकेत दमदार खेळ करुन आयसीसी टेस्ट क्रमवारीत अव्वल क्रमांक पटकावले आहे.