ETV Bharat / sports

स्टीव स्मिथचे २६ वे शतक; विराट कोहलीला टाकले मागे - अॅशेस २०१९

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगलेल्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथने १६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. पहिल्या दिवशी स्मिथ ६० धावांवर नाबाद खेळत होता. त्यानंतर आज ( गुरुवारी ) दुसऱ्या दिवशी त्याने शतक पूर्ण केले.

अॅशेस २०१९ : स्टिव स्मिथ भन्नाट फार्मात, २६ वे शतक ठोकत विराट कोहलीला टाकले मागे
author img

By

Published : Sep 5, 2019, 7:20 PM IST

मँचेस्टर - ऑस्ट्रेलियाचा भरवशाचा फलंदाज स्टीव स्मिथ इंग्लंड विरुध्द सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत भन्नाट फार्मात आहे. त्याने अॅशेसच्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक ठोकले. स्मिथचे हे २६ वे शतक असून या मालिकेतील त्याचे हे तिसरे शतक आहे.

मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगलेल्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथने १६० चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. पहिल्या दिवसी स्मिथ ६० धावांवर नाबाद खेळत होता. त्यानंतर आज ( गुरुवारी ) दुसऱ्या दिवशी त्याने शतक पूर्ण केले.

अॅशेस : बेल्सशिवाय खेळवला सामना...क्रिकेट इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

स्टीव स्मिथने सुरू असलेल्या अॅशेस मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये दोन्ही डावात शतक ठोकले आहे. तसेच त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये देखील ९२ धावा केल्या. या खेळीदरम्यान, स्मिथला इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चरचा चेंडू लागला. यामुळे स्मिथला रिटायर्ड हर्ट व्हावे लागले.

विराटच्या 'त्या' फोटोवर लोक म्हणाले, बायकोने घराबाहेर काढल्याने झाली का ही अवस्था?

यानंतर तो याच कसोटीच्या दुसऱ्या डावामध्ये खेळू शकला नाही. स्मिथची दुखापत गंभीर असल्याने, त्याला तिसऱ्या कसोटीसाठी संघात निवडण्यात आले नाही. मात्र, त्यानंतर तो चौथ्या कसोटीसाठी फिट झाला आणि मैदानात उतरला. या कसोटीत त्याने पहिल्या डावात शतक ठोकले.

दरम्यान, स्टीव स्मिथ चेंडू छेडछाड प्रकरणी एक वर्षाच्या निलंबनाच्या शिक्षेनंतर मैदानात उतरला आहे. त्याने शतकांच्या बाबतीत भारताचा कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीने कसोटीमध्ये २५ शतके ठोकली आहेत. तर स्मिथने ६७ कसोटी सामन्यात २६ शतके ठोकली आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.