मँचेस्टर - इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलिया संघामध्ये अॅशेस मालिका सुरू असून या मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. सामन्याच्या पहिला दिवशी काही षटके बेल्सशिवाय खेळवण्यात आली. असा प्रकार क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला.
चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आला आणि सलामीवीर डेव्हिड वार्नर खाते न उघडताच माघारी परतला. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना इंग्लंडच्या गोलंदाजांचा सामना करणे कठीण झाले होते. त्यात ३२ व्या षटकामध्ये मैदानावर जोरात वारे वाहू लागले.
अॅशेस : व्वा छा गये गुरू.. पहा स्मिथचा जगावेगळा कव्हर ड्राइव्ह
वाऱ्याचा वेग इतका जोरात होता की, यष्टीवर लावलेली बेल्स वारंवार खाली पडत होत्या. तेव्हा पंचानी आयसीसीच्या एका नव्या नियमाचा वापर केला आणि काही काळ सामना बेल्स शिवाय खेळवला.
अफगाणिस्तानचा पठाण' रशीद खानने केला क्रिकेट विश्वात कोणालाही न जमलेला विक्रम
नेमक काय घडलं -
मँचेस्टरच्या मैदानावर वारे जोराने वाहू लागल्याने, मैदानात असलेल्या पंच कुमार धर्मसेना आणि मराएस एरासमस यांनी आपापसात चर्चा केली आणि आययीसीचे नियम ८.५ चा वापर करत ऑस्ट्रेलिया विरुध्द इंग्लंड हा सामना काही काळ बेल्सशिवाय खेळविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पंचांच्या या निर्णयावर इंग्लंडच्या खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे.