नवी दिल्ली - अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा संघाच्या कर्णधारामध्ये बदल केला आहे. इंग्लंडमध्ये पार पडलेल्या एकदिवसीय विश्व करंडक स्पर्धेआधी संघाचे नेतृत्व गुलबदीन नईबकडे देण्यात आले होते. बोर्डाने विश्व करंडक स्पर्धेनंतर पुन्हा कर्णधार बदलला आणि एकदिवसीय आणि टी-२० संघाची कमान युवा राशिद खानकडे सोपवली होती.
अफगाणिस्तान आता पुन्हा बोर्डाने कर्णधारपदामध्ये बदल केला असून अनुभवी खेळाडू असगर अफगाणकडे संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
-
BREAKING: ACB have reappointed Asghar Afghan as 🇦🇫 captain in all formats! pic.twitter.com/ZMYAkBkUIe
— ICC (@ICC) December 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BREAKING: ACB have reappointed Asghar Afghan as 🇦🇫 captain in all formats! pic.twitter.com/ZMYAkBkUIe
— ICC (@ICC) December 11, 2019BREAKING: ACB have reappointed Asghar Afghan as 🇦🇫 captain in all formats! pic.twitter.com/ZMYAkBkUIe
— ICC (@ICC) December 11, 2019
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी संघाच्या नेतृत्वात बदल केला आणि कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये असगरकडे अफगाणिस्तानचे नेतृत्व दिले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन अफगाणिस्तान संघाच्या कर्णधारपदी असगर अफगाणची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती दिली. २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या असगरने आतापर्यंत १११ एकदिवसीय, ६६ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळली आहेत.
हेही वाचा - भारताविरुद्धच्या निर्णायक सामन्याआधी विंडीजला मोठा धक्का, 'हा' खेळाडू दुखापतीमुळे 'आऊट'
हेही वाचा - 'मी धोनीला चांगला ओळखतो, तो कधीही स्वतःला संघावर थोपवणार नाही'
हेही वाचा - दुखापतग्रस्त शिखर धवन संघातून बाहेर; मयंक अग्रवालला संधी