ETV Bharat / sports

कधी वाटलं नव्हतं की एवढा मोठा सन्मान मिळेल - विराट कोहली

अरुण जेटली स्टेडियमच्या (पूर्वी फिरोजशाह कोटला स्टेडीयम) एका पॅवेलियनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी गुरुवारी ही घोषणा केली.

विराट कोहली
author img

By

Published : Sep 12, 2019, 9:17 PM IST

नवी दिल्ली - अरुण जेटली स्टेडियमच्या (पूर्वी फिरोजशाह कोटला स्टेडीयम) एका पॅवेलियनला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव देण्यात आले आहे. दिल्ली क्रिकेट संघाचे (डीडीसीए) अध्यक्ष रजत शर्मा यांनी गुरुवारी ही घोषणा केली. मी असा कधी विचारही केला नव्हता की, माझ नावं पॅवेलीयनला दिले जाईल. हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याची प्रतिक्रिया कोहलीने व्यक्त केली आहे.

virat kohali pavilion
विराट कोहली पॅवेलीयन

हेही वाचा - किंग कोहलीने मैदानाच्या बाहेर केला मोठा विक्रम, सचिनला टाकले मागे

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथील आयोजित कार्यक्रमात ही घोषणा केली. विराट कोहली म्हणाला, "इतका मोठा सन्मान केल्याबद्दल मी रजत शर्मा, भारतीय संघ, दिल्लीचे इतर संघ तसेच बीसीसीआयचा ऋणी आहे." तसेच कोहलीने आपल्या लहानपणीच्या प्रशिक्षकांचे सुद्धा आभार मानले आहेत.

हेही वाचा - 'स्टायलिस्ट' विराट कोहली नाबाद '११'..लिहली भावनिक पोस्ट

कोहली म्हणाला, "मिळालेल्या सन्मानाबद्दल मी माझ्या कुटुंबीयांचा आणि अरुण जेटली यांचा खूप ऋणी आहे." या सन्मानामुळे कोहलीच्या चाहत्यांनी समाज माध्यमावर कौतुकाचा वर्षाव केल्याचे पाहायले मिळाले.

जेटलींची आठवण -

यावेळी जेटली यांची एक आठवण सांगताना, कोहली म्हणाला, ज्यावेळी माझे वडील आम्हाल कुटुंबीयांना सोडून गेले त्यावेळी जेटलीजी आमच्या घरी आले होते. त्यांनी आम्हा सगळ्यांना धीर देण्याचं काम केले. ते एक नेताच नव्हते तर चांगले आणि प्रेमळ व्यक्ती होते.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.