ETV Bharat / sports

VIDEO : 'हातात बॅट होती, षटकार मारले आता हातात तलवार आहे'..पाक क्रिकेटरचे चिथावणीखोर वक्तव्य - षटकार

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर जावेद मियॉंदाद हा चिथावणीखोर वक्तव्य करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मियॉंदाद जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणत आहे की, 'काश्मीरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझ्या हातात जेव्हा बॅट होती तेव्हा मी षटकार मारले होते. आता माझ्या हातात तलवार आहे.' हा व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO : 'हातात बॅट होती, षटकार मारले आता हातात तलवार आहे'..पाक क्रिकेटरचे चिथावणीखोर वक्तव्य
author img

By

Published : Sep 5, 2019, 12:35 PM IST

कराची - भारत सरकारने काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. भारताचा हा निर्णय पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. यावर पाकिस्तानमधून आगपाखड केली जात आहे. पाकच्या पंतप्रधानांसह नेतेमंडळी, तसेच माजी-आजी क्रिकेटर भडकले असून यावर काही जणांनी तर चिथावणीखोर वक्तव्येही केली आहेत. यात पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याचाही समावेश आहे.

पाकिस्तान संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी मिसबाह, वकार युनिसकडे 'ही' जबाबदारी

जावेद मियाँदाद हा चिथावणीखोर वक्तव्य करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मियाँदाद जमलेल्या लोकांना उद्देशून म्हणत आहे की, 'काश्मीरी बांधवांनो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत. माझ्या हातात जेव्हा बॅट होती तेव्हा मी षटकार मारले होते. आता माझ्या हातात तलवार आहे.' हा व्हिडीओ ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडची लंकेवर ४ विकेट्सने मात, मालिकेत २-० ने आघाडी

दरम्यान, यापूर्वीदेखील मियाँदाद याने काश्मीर विषयावरुन गरळ ओकली होती. त्याने यापूर्वी आमच्याकडे अण्वस्त्रे आहेत. आम्ही ती फक्त दाखवण्यासाठी ठेवलेली नाही. संधी मिळाली की, त्याचा वापर करुन भारताला अण्वस्त्र वापरून बेचिराख करून टाकू, अशी दर्पोक्ती जावेद मियाँदादने याने याआधी केली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.