मुंबई - बांगलादेश विरुध्द कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानात रंगलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात टीम इंडियाने १ डाव ४६ धावांनी विजय मिळवत २ सामन्यांची कसोटी मालिकेत २-० ने निर्भेळ यश संपादन केले. मालिका विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने मुंबईकडे प्रस्तान केले. विराट मुंबईत पोहोचल्यानंतर पत्नी अनुष्काने विराटला खास सरप्राईज दिलं.
अनुष्का शर्मा विराटला घेण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचली होती. विराट आपल्या कारमध्ये पोहोचला तेव्हा अनुष्काने त्याला मिठी मारली. यापूर्वीही अनेकदा अनुष्का विराटला घेण्यासाठी विमानतळावर आलेली पाहावयास मिळाली आहे. अनुष्काने विराटला मारलेल्या मिठीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काही दिवसांपूर्वी विराट-अनुष्का हे दोघेही भूटानला सुट्टीसाठी गेले होते. या सुट्टीदरम्यान, विराटने आपला वाढदिवस साजरा केला. दरम्यान, टीम इंडिया आता वेस्ट इंडीज विरुध्द टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातील टी-२० मालिकेला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना हैदराबादच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपदाचा थरार...३६ तासात ३ संघानी मिळवला डावाने विजय, न्यूझीलंडने पाडला इंग्लंडचा फडशा
हेही वाचा - ऐतिहासिक 'गुलाबी' विजयानंतर भारतीय संघाने केलेले विक्रम, वाचा एका क्लिकवर.....
हेही वाचा - मराठा अरेबियन्सने डेक्कनला धूळ चारत जिंकली टी-१० स्पर्धा