नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी कर्णधार अनिल कुंबळे आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) किंग्स इलेव्हन पंजाब संघाने आगामी हंगामासाठी कुंबळेला आपला मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमले आहे.
हेही वाचा - ऐतिहासिक!..तब्बल ४० वर्षांनंतर इराणच्या महिलांनी पाहिला फुटबॉल सामना
एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार, कुंबळे १९ ऑक्टोबरला संघासमोर भविष्यकाळातील योजना समोर ठेवणार आहे. न्यूझीलंडचे माईक हेसन यांच्या जागी कुंबळे आता पंजाब संघाची धुरा सांभाळेल.
हेसन यांनी किंग्स इलेव्हन पंजाब संघासोबत दोन वर्षांचा करार केला होता. मात्र, त्यांनी आपले पद मध्येच सोडले होते. भारतासाठी अनिल कुंबळेने सर्वाधिक बळी मिळवले आहेत. यापूर्वी आयपीएलमध्ये कुंबळेने बंगळूरू आणि मुंबईचे प्रशिक्षकपद सांभाळले होते. २०१६ मध्ये टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदीही त्यांची निवड झाली होती.