ETV Bharat / sports

Ind vs Ban: ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला अमित शाह उपस्थित राहणार - भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना

भारत-बांगलादेश संघातील या सामन्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या ऐतिहासिक कसोटी सामन्याला हजेरी लावणार आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

Ind vs Ban: ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला अमित शाह उपस्थित राहणार
author img

By

Published : Nov 14, 2019, 4:59 PM IST

कोलकाता - भारतामध्ये प्रथमच होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी सामन्याला ईडन गार्डन्स मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर राहणार आहेत. २२ ते २६ नोव्हेंबर दरम्यान, भारत आणि बांगलादेश संघात रंगणाऱ्या ऐतिहासिक सामन्याला बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.

भारत आणि बांगलादेश संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. मालिकेतील पहिला सामना इंदूरच्या होळकर मैदानावर रंगला आहे. पण आतुरता दुसऱ्या सामन्याची आहे. कारण हा सामना दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. दोन्ही देशांसाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे म्हटले जात आहे.

बीसीसीआयने काही वर्षांपासून दिवस-रात्र कसोटी सामन्याला नकार दिला होता. मात्र, सौरव गांगुलीने बीसीसीआय अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर, संघटनेत अनेक बदल होताना दिसत आहेत.

भारत-बांगलादेश संघातील या सामन्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. बांगलादेशी पंतप्रधान शेख हसीना आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील या ऐतिहासिक कसोटी सामन्याला हजेरी लावणार आहेत. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे सचिव अभिषेक दालमिया यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, दिग्गज नेते आणि मान्यवर या सामन्याला उपस्थित राहणार असल्यामुळे ईडन गार्डन्स परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे.

हेही वाचा - चेंडू कुरतडल्याने विंडीजच्या निकोलस पूरनवर ४ सामन्यांची बंदी

हेही वाचा - Ind vs Ban : भारतीय गोलंदाजांची भन्नाट कामगिरी; बांगलादेशचे अवघ्या १५० धावात लोटांगण

Intro:Body:

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.