दिल्ली - आयपीएलमध्ये गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ४० धावांनी विजय मिळवला. या विजयासह मुंबईच्या संघाने आयपीएलच्या गुणतालितेत दुसरे स्थान मिळवले आहे. या सामन्यात दिल्लीला पराभव झाला असला तरी त्यांचा अनुभवी गोलंदाज अमित मिश्राने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
-
WATCH: @MishiAmit bamboozles Hitman to pick up his 150th wicket in #VIVOIPL 😎😎
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full video here ▶️▶️https://t.co/e5qZU7uQs7 pic.twitter.com/9kirzsmWEI
">WATCH: @MishiAmit bamboozles Hitman to pick up his 150th wicket in #VIVOIPL 😎😎
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2019
Full video here ▶️▶️https://t.co/e5qZU7uQs7 pic.twitter.com/9kirzsmWEIWATCH: @MishiAmit bamboozles Hitman to pick up his 150th wicket in #VIVOIPL 😎😎
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2019
Full video here ▶️▶️https://t.co/e5qZU7uQs7 pic.twitter.com/9kirzsmWEI
या सामन्यात अमित मिश्राने मुंबईचा सलामिवीर आणि कर्णधार रोहित शर्माला ३० धावांवर बाद करताच आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. रोहितला बाद करताच मिश्राने १५० विकेटचा टप्पा पार करत सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. आयपीएलमध्ये अशी अशी कामगीरी करणारा तो पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.
सर्वाधिक बळी मिळवण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा १६१ विकेटसह पहिल्या तर पियुष चावला १४६ विकेटसह तिसऱ्या स्थानी आहे.
फिरोज शाह कोटला मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईने दिल्लीसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ १२८ धावा करु शकला. मुंबईकडून राहुल चाहरने सर्वाधिक ३ विकेट घेतल्यात