ETV Bharat / sports

विश्वकरंडक स्पर्धेत धारदार गोलंदाजी हे भारताचे प्रमुख अस्त्र असेल - अजिंक्य रहाणे

भारताच्या ताफ्यात फिरकी आणि वेगवान या दोन्ही प्रकारात जागतिक दर्जाचे अव्वल गोलंदाज आहेत.

अजिंक्य रहाणे
author img

By

Published : May 14, 2019, 11:53 PM IST

मुंबई - आगामी विश्वकरंडकासाठी आता काहीच दिवस बाकी राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या मते सध्याचा भारतीय संघाकडे असलेले गोलंदाज हे अनुभवी आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे भारताकडे विश्वचषक जिंकण्याची संधी असणार आहे.

अजिंक्य म्हणाला की, 'यंदाच्या विश्वकरंडकस्पर्धेत धारदार गोलंदाजी ही भारताचे प्रमुख अस्त्र असणार आहे. भारताच्या ताफ्यात फिरकी आणि वेगवान या दोन्ही प्रकारात जागतिक दर्जाचे अव्वल गोलंदाज आहेत. हे गोलंदाज भारताला कोणत्याही वातावरणात यश मिळवून देऊ शकतात. त्यामुळे भारताकडे विश्वचषक जिंकण्याची सर्वाधिक संधी असणार आहे.

जसप्रीत बुमराह हा भारताच्या वेगवान गोलंदाजीचा महत्वाचा भाग असुन गेल्या काही काळात त्याने भारतीय क्रिकेट संघासाठी आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्याच्यासोबतच मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा यांनीही दमदार गोलंदाजी करत भारताला यापूर्वी अनेक विजय मिळवून दिले आहेत

इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. यात भारतीय संघाचा पहिला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ

  • विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.

Intro:Body:

sachin - sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.