काबूल - अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) माजी कर्णधार रईस अहमदझाई याची नवीन क्रिकेट संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. अहमदझाई आता अॅन्डी मोल्सची जागा घेईल, ज्यांनी क्रिकेट संचालक आणि मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहिले होते. माजी कर्णधार अहमदझाईने अफगाणिस्तानकडून ५ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर तो अफगाणिस्तान संघात प्रशिक्षक म्हणून काम करत होता.
-
Senior national coach Raiees Ahmadzai has been appointed as the Cricket Director of Afghanistan Cricket Board replacing Mr. Andy Moles.
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More: https://t.co/LW7nRkX8x3 pic.twitter.com/KlXmq0ZFbF
">Senior national coach Raiees Ahmadzai has been appointed as the Cricket Director of Afghanistan Cricket Board replacing Mr. Andy Moles.
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 24, 2020
More: https://t.co/LW7nRkX8x3 pic.twitter.com/KlXmq0ZFbFSenior national coach Raiees Ahmadzai has been appointed as the Cricket Director of Afghanistan Cricket Board replacing Mr. Andy Moles.
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) August 24, 2020
More: https://t.co/LW7nRkX8x3 pic.twitter.com/KlXmq0ZFbF
एसीबीने म्हटले "राष्ट्रीय संघासाठी तांत्रिक बाबी मजबूत करणे, खेळाडूंची क्षमता वाढवणे आणि खेळाडूंच्या विकास आणि प्रशिक्षणाशी संबंधित धोरणांची अंमलबजावणी करणे हे या नियुक्तीचे उद्दिष्ट आहे."
३५ वर्षीय अहमदझाई यापूर्वी अफगाणिस्तान अंडर-१९ संघाचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याने खेळलेल्या पाच एकदिवसीय सामन्यात ८८ तर, आठ टी-२० सामन्यात ९१ धावा केल्या आहेत. अहमदझाईने २००९मध्ये स्कॉटलंडविरूद्ध पदार्पण केले. एका वर्षातच तो निवृत्त झाला. त्याने फेब्रुवारी २०१०मध्ये आयर्लंडविरूद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर, शेवटचा टी-२० सामना त्याच वर्षी मे महिन्यात दक्षिण आफ्रिकाविरूद्ध खेळला.
एसीबीने नुकताच अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नबीला क्रिकेट मंडळाचा सदस्य म्हणून नेमले.