नवी दिल्ली - माजी भारतीय फलंदाज विरेंद्र सेहवागची पत्नी आरती सेहवाग हिने बिझनेस पार्टनरविरोधात तक्रार दाखल केली आहे. अॅग्रो क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीत सहकारी असणाऱ्या ८ जणांनी परस्पर सह्या करुन ४ कोटी ५० लाख रुपयांचे परस्पर कर्ज काढल्याचा आरोप आरतीने केला आहे.
बिझनेस पार्टनर्सनी माझ्या पतीच्या नावाचा गैरवापर करुन गुंतवणूकदारांना आकर्षित केले. यासोबतच त्यांनी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करत त्यांच्याकडून चेक घेतले. परंतु, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास कंपनी असमर्थ ठरली. यामुळे गुंतवणूकरांनी न्यायालयात धाव घेताना कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला. यावेळी प्रकरणाची चौकशी करताना धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये माझी खोटी सही करुन बिझनेझ पार्टनर्सनी गुंतवणूकदारांकडून पैसे घेतल्याचे समोर आले, असे आरोप आरती सेहवागने बिझनेस पार्टनरविरोधात केले आहेत.
पोलिसांनी आरती सेहवागने दिलेल्या तक्रारीवरुन भा.दं.वि कलम ४२०, कलम ४६८, कलम ४७१ आणि ३४ यानुसार फसवणूक आणि खोट्या कागदपत्रांचा वापर इत्यादी आरोपाखाली बिझनेस पार्टनर्सविरोधात गुन्हा दाखल केला आहे.