दुबई - आयपीएलमध्ये शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना पार पडला. या सामन्यातील एका व्हिडिओमध्ये बंगळुरूचा स्टार फलंदाज अॅरोन फिंच ई-सिगारेट पिताना आढळून आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.
राजस्थानने ठेवलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बंगळुरूची अवस्था १३ षटकात ३ बाद १०२ अशी केविलवाणी झाली होती. यानंतर मैदानात आलेल्या ए. बी. डिव्हिलियर्सने सामन्याची सूत्रे हाती घेत मैदानावर चौफेर फटकेबाजी केली. या डावाच्या शेवटच्या षटकात बंगळुरूला दहा धावांची आवश्यकता असताना ड्रेसिंग रूममध्ये फिंच ई-सिगारेट पिताना दिसून आला.
-
Finch vaping in the dressing room😂 #Dream11IPL #IPL2020 #RRvsRCB pic.twitter.com/sx5rqsCTHd
— Kevin Shah (@_Kevin__Shah) October 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Finch vaping in the dressing room😂 #Dream11IPL #IPL2020 #RRvsRCB pic.twitter.com/sx5rqsCTHd
— Kevin Shah (@_Kevin__Shah) October 17, 2020Finch vaping in the dressing room😂 #Dream11IPL #IPL2020 #RRvsRCB pic.twitter.com/sx5rqsCTHd
— Kevin Shah (@_Kevin__Shah) October 17, 2020
राजस्थानविरुद्ध अखेरच्या षटकात बंगळुरूला विजयासाठी १० धावांची गरज होती. तेव्हा डिव्हिलियर्सने जोफ्रा ऑर्चरच्या चौथ्या चेंडूवर षटकार खेचत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीबीने हा सामना ७ गडी आणि २ चेंडू राखून जिंकला. डिव्हिलियर्सने २२ चेंडूत १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५५ धावांची तुफानी खेळी केली. त्याला गुरकीरतने चांगली साथ दिली.