ETV Bharat / sports

Question on KL Rahul Batting : केएल राहुलच्या फलंदाजीवर क्रिकेटच्या दिग्गजांनी उपस्थित केले प्रश्न

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) मध्ये ईडन गार्डन्सवर आरसीबी विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्याच्या 19 व्या षटकापर्यंत लखनौ सुपर जायंट्सच्या कर्णधाराची संथ फलंदाजी हे संघाच्या पराभवाचे मुख्य कारण असल्याचे मत, भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक, न्यूझीलंडचे दिग्गज आणि इतरांनी मांडले आहे. त्याचबरोबर त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

KL Rahul
KL Rahul
author img

By

Published : May 27, 2022, 4:39 PM IST

कोलकाता: लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्याच्या 19 व्या षटकापर्यंत संथ फलंदाजी केली. त्यामुळे त्याची ही फलंदाजी त्याच्या संघाच्या अपयशी ठरण्याचे कारण आहे, असे मत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, संजय मांजरेकर आणि न्यूझीलंडचे दिग्गज डॅनियल व्हिटोरी यांनी मत मांडले आणि त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले ( Cricket legends raised questions ) आहेत.

कारण ईडन गार्डन्सवर 207 च्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, लखनौ संघ आरसीबीकडून फक्त 14 धावांनी पराभूत झाला,ज्यामुळे त्यांना आयपीएल 2022 मधून बाहेर पडावे लागले. माजी क्रिकेटपटूंपैकी मांजरेकर त्यांच्या खेळीबद्दल नाराज दिसत होते. राहुलने अशा प्रकारच्या कर्णधार ( KL Rahul ) पदाची जबाबदारी घ्यायला नको होती, असे ते म्हणाले.

त्यांनी ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, "आम्ही केएल राहुलला आतापर्यंत बऱ्याचदा पाहिले आहे की, जेव्हा तो कर्णधार बनतो तेव्हा तो संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून कामगिरी करतो. त्याच वेळी विराट कोहली आणि एमएस धोनीला ही जबाबदारी आवडत होती. या मोसमात सोडले तर रोहित शर्मालाही साधारणपणे अशा प्रकारची जबाबदारी आवडते. कदाचित, केएल राहुल स्वभावाने अशा प्रकारची जबाबदारी घेण्यास तयार नसेल, कारण तो प्रत्येक वेळी संघाला जिंकून देऊ शकत नाही.

राहुलने डावाची सुरुवात केली आणि 19व्या षटकात तो बाद झाला. पण 58 चेंडूत 136.20 च्या स्ट्राईक रेटने केवळ 79 धावाच करू शकला. 16व्या षटकापर्यंत त्याचा स्ट्राईक रेट 120 होता, जो मांजरेकरांना ( Former Player Sanjay Manjarekar ) चांगला वाटला नाही. मांजरेकर म्हणाले, "जर मी त्यांचा प्रशिक्षक असतो, तर कर्णधार असतानाही मी त्याला वेगवान फलंदाजी करण्यास सांगितले असते, कारण आम्ही असे बरेच सामने पाहिले आहेत, ज्यात केएल राहुलने फक्त जास्त वेळ फलंदाजी करण्याऐवजी वेगवान फलंदाजी केल्यास संघाला खूप फायदा होईल."

जोश हेझलवूडविरुद्ध ( Against Josh Hazelwood )त्याने काही उत्कृष्ट शॉट्स खेळले. पण त्याने आपला दृष्टिकोन बदलला होता, ज्यामुळे त्याला वेगवान खेळण्याऐवजी जास्त वेळ फलंदाजी करायची होती. न्यूझीलंडचा माजी कर्णधार व्हिटोरी म्हणाला की, आयपीएलमध्ये वेगवान फलंदाजी करण्याऐवजी लांब डाव खेळण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. व्हिटोरी म्हणाला, मग पॉवरप्लेमध्ये 42 ते 60 धावा करणे योग्य आहे, कारण त्यामुळे दुसऱ्या संघावर दबाव येतो.

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Former head coach Ravi Shastri ) देखील एलिमिनेटरमध्ये राहुलच्या दृष्टिकोनावर नाराज होते. शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, त्याने थोडे आधी वेगाने खेळायचे होते. काहीवेळा, आपण खूप प्रतीक्षा करतो, परंतु येथे, नवव्या आणि 14 व्या षटकांदरम्यान, हुडा आणि राहुलच्या भागीदारीतील एका खेळाडूला वेगवान फलंदाजी करण्याची गरज होती.

हेही वाचा - Jyoti Break National Record : ज्योतीने दोन आठवड्यात तिसऱ्यांदा मोडला राष्ट्रीय विक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.