ETV Bharat / sports

Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर दिसणार क्रिकेटचा थरार, २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश

Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये १२८ वर्षांनंतर क्रिकेट परतणार आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक २०२८ मध्ये क्रिकेटसह अन्य ४ खेळांचा समावेश करण्यात आलाय. या संदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी...

Cricket in Olympics
Cricket in Olympics
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 7:21 PM IST

नवी दिल्ली Cricket in Olympics : जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तब्बल १२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं २०२८ मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यास मान्यता दिली. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये टी-२० क्रिकेटचा समावेश करण्यात आलाय.

१९०० मध्ये एकमेव सामना झाला होता : ऑलिम्पिकमध्ये यापूर्वी फक्त एकदाच क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. १२८ वर्षांपूर्वी १९०० मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्या ऑलिम्पिकमध्ये फक्त एकच सामना खेळला गेला होता. ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्स दरम्यान झालेल्या या एकमेव सामन्यात ग्रेट ब्रिटननं फ्रान्सचा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं होतं. त्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पुन्हा कधी क्रिकेटचा समावेश झाला नाही.

क्रिकेटशिवाय या ४ खेळांचा समावेश : ऑलिम्पिक मंडळाच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत क्रिकेटशिवाय अन्य ४ खेळांचा समावेश करण्याची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल/सॉफ्टबॉल, लॅक्रोस आणि स्क्वॅशचाही २०२८ ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. लॉस एंजेलिस आयोजन समितीनं या खेळांची शिफारस केली होती.

आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत समावेश : अलीकडेच, आशियाई क्रीडा स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यावर्षी चीनच्या हांगझाऊ येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघांनी सुवर्णपदकं जिंकली. तसेच गेल्या वर्षी इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे खेळल्या गेलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. यापूर्वी १९९८ मध्ये पुरुषांच्या वनडे फॉरमॅटला राष्ट्रकुल स्पर्धेत स्थान मिळालं होतं. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघानं सुवर्णपदक जिंकलं, तर टीम इंडियाला रौप्यपदक जिंकण्यात यश आलं होतं.

हेही वाचा :

  1. Cricket World Cup २०२३ : विश्वचषकात रोहितची गाडी सुसाट! सर्वाधिक शतक, सर्वाधिक षटकार; जाणून घ्या किती रेकॉर्ड मोडले
  2. Cricket World Cup २०२३ : डेंग्यूनं ग्रस्त शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार का? जाणून घ्या हेल्थ अपडेट
  3. Cricket World Cup 2023 : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर बाबर आझमनं काय केलं, हैदराबादच्या ग्राउंड स्टाफला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.