मेलबर्न - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताला जगभरातून मदतीचा ओघ येत आहे. यामध्ये आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाची भर पडली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोना टेस्ट आणि ऑक्सिजनसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मदत जाहीर केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जवळपास ३७ लाख रुपयांची मदत केली आहे.
देशात दिवसागणिक कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. मागील काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्था कोळमडली आहे. अशात क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर्स असोसिएशन आणि यूनिसेफ ऑस्ट्रेलिया भारतातील कोरोनाच्या लढ्यासाठी मदतीला सरसावले आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ निक हॉकले म्हणाले की, 'ऑस्ट्रेलियन आणि भारतीयांचे एक वेगळं नात आहे. क्रिकेटमुळे दोन्ही देश जोडले गेले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही भारतासोबत आहोत. शक्य तितकी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतातील लोकांच्या दुखा:त आम्ही सहभागी आहोत.'
-
Australian Cricket will throw its support behind the India COVID-19 Crisis Appeal by partnering with the @ACA_Players and @unicefaustralia to raise much needed funds.
— Cricket Australia (@CricketAus) May 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Donate to UNICEF Australia’s India COVID-19 Crisis Appeal: https://t.co/JWpslbtY2j pic.twitter.com/E0CMow6h8z
">Australian Cricket will throw its support behind the India COVID-19 Crisis Appeal by partnering with the @ACA_Players and @unicefaustralia to raise much needed funds.
— Cricket Australia (@CricketAus) May 2, 2021
Donate to UNICEF Australia’s India COVID-19 Crisis Appeal: https://t.co/JWpslbtY2j pic.twitter.com/E0CMow6h8zAustralian Cricket will throw its support behind the India COVID-19 Crisis Appeal by partnering with the @ACA_Players and @unicefaustralia to raise much needed funds.
— Cricket Australia (@CricketAus) May 2, 2021
Donate to UNICEF Australia’s India COVID-19 Crisis Appeal: https://t.co/JWpslbtY2j pic.twitter.com/E0CMow6h8z
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियन नागरिकांना देखील प्रोत्साहित करणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया आधी पॅट कमिन्स आणि ब्रेट ली यांनी भारताला मदत केली आहे. पॅटनं ३७ तर ब्रेट ली यानं ४१ लाखांची मदत दिली आहे. याशिवाय आयपीएलमधील संघ राजस्थान रॉयल्सने ७.५ कोटी रुपयांची मदत दिली आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : चेन्नईच्या ताफ्यातही कोरोनाचा शिरकाव; ३ सदस्यांना लागण
हेही वाचा - श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा