ETV Bharat / sports

INDvWI : भारतीय संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने, मयंक अग्रवालचा संघात समावेश - Standby player Navdeep Saini

वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघातील काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच बीसीसीआयने या मालिकेसाठी मयंक अग्रवालचा संघात समावेश (Mayank Agarwal included for ODI series) केला आहे.

Mayank Agarwal
Mayank Agarwal
author img

By

Published : Feb 3, 2022, 12:19 PM IST

अहमदाबाद - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India v West Indies) वनडे मालिकेला सुरुवात होण्याअगोदर भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ज्यामध्ये भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता बीसीसीआयने मयंक अग्रवालचा वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश केला आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यात मयंक अग्रवालने चांगली कामगिरी केली होती. त्याचा फायदा आता मयंक अग्रवालला झाला आहे. तत्पुर्वी बुधवारी भारतीय क्रिकेट संघाला कोविड-19 चा फटका बसला आहे. ज्यामध्ये शिखर धवन, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि स्टँडबाय खेळाडू (Standby player Navdeep Saini) नवदीप सैनी कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंमध्ये समावेश आहे. तसेच सपोर्ट स्टाफमधील चार सदस्यांना कोरोनाची (support staff Four members corona positive) लागण झाली आहे. यामध्ये संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी. दिलिप, मसाजीस्ट राजकुमार व इतर दोन जणांना लागण झाली आहे.

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी 31 जानेवारी रोजी अहमदाबाद येथे दाखल झाला होता. आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेनंतर तीन दिवसांच्या आयसोलेशनमधून होता. या मालिकेची सुरुवात अहमदाबादमध्ये 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा भारताचा 1000 वा एकदिवसीय सामना (India's 1000th ODI) असणार आहे. परंतु हे तीन खेळाडू यापुढे मालिकेत खेळू शकणार नाहीत. कारण त्यांना एक आठवडा विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यानंतर दोन नकारात्मक आरटी-पीसीआर निकाल आल्यानंतर ते भारतीय संघाशी जोडले जातील.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, "तीन खेळाडू - रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि शिखर धवन यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तथापि, सपोर्ट स्टाफमध्येही कोविडची अनेक पॉझिटिव्ह प्रकरणे आढळून आली आहेत."

अधिकाऱ्याने सांगितले की, "खेळाडूंमध्ये आजाराची लक्षणे दिसत नाहीत आणि आशा आहे की आयसोलेशन संपेपर्यंत ते बरे होतील. तुम्हाला शिखरसाठी वाईट वाटेल कारण तो मालिकेत (ODI) भाग घेणार नाही आणि तो T20I मालिकेत ही भाग घेऊ शकणार नाही." त्याहूनही निराशाजनक युवा खेळाडू रुतुराज गायकवाड हा गेल्या दीड वर्षात दुसऱ्यांदा कोविड-19 साठी पॉझिटिव्ह आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.