ETV Bharat / sports

IPL 2022 Upadates : आयपीएलमधील दोन सर्वोत्तम फिरकीपटू आमच्याकडे - मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा

राजस्थान रॉयल्सचे क्रिकेटचे संचालक आणि मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा ( Head Coach Kumar Sangakkara ) यांचे मत आहे की, यंदा त्यांच्याकडे खूप सक्षम संघ आहे. जो गेल्या तीन खराब हंगामानंतर इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये दमदार कामगिरी करू शकतो.

Kumar Sangakkara
Kumar Sangakkara
author img

By

Published : Mar 17, 2022, 4:55 PM IST

मुंबई: आयपीएल 2022 च्या हंगामाला सुरुवात होण्यासाठी आता काही दिवसाचा अवधी बाकी आहे. तत्पुर्वी राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य कोच ( Rajasthan Royals head coach ) कुमार संगकारा यांनी मोठे विधान केले आहे. त्यांचे म्हणने आहे की, यंदा त्यांच्यासाकडे खुपच सक्षम संघ आहे. जो गेल्या तीन खराब हंगामानंतर इंडियन प्रीमियर लीगमध्ये ( Indian Premier League ) दमदार कामगिरी करू शकतो. गेल्या तीन हंगामात रॉयल्स संघ सातव्या, आठव्या आणि सातव्या स्थानावर राहिला होता.

श्रीलंकेचा माजी कर्णधार संगकारा ( Former Sri Lankan captain Sangakkara ) म्हणाले, आम्हाला माहित आहे की ऑफ सीझनमध्ये आम्हाला आमच्या संघासाठी खूप काम करावे लागेल. मला वाटते की ज्या विभागांकडे लक्ष देणे आवश्यक होते. तसेच लिलावात खेळाडूंची निवड करताना आम्ही योग्य प्रक्रियेचे पालन करू शकलो. आम्ही आमच्यासाठी सेट केलेल्या पॅरामीटर्सची पूर्तता करण्यात यशस्वी झालो.

ते म्हणाले, मला वाटते की, फ्रँचायझीने मजबूत संघ निवडून उत्तम कामगिरी केली आहे. संघाच्या नियोजनवार प्रतिक्रिया देताना संगकारा म्हणाला, युझवेंद्र चहल आणि रविचंद्रन अश्विन ( Yuzvendra Chahal and Ravichandran Ashwin ) यांच्या उपस्थितीने मोठा फरक पडेल.

संगकारा म्हणाले, लेग स्पिन आणि ऑफ स्पिनच्या बाबतीत चहल आणि अश्विन आयपीएलमधील दोन सर्वोत्तम फिरकीपटू ( Two best spinners in the IPL ) आमच्याकडे आहेत. आमच्याकडे (ट्रेंट) बोल्ट, प्रसिद्ध (कृष्णा), (नवदीप) सैनी, (नाथन) कुल्टर-नाईल, (ओबेद) मॅके मजबूत वेगवान गोलंदाजी आहे. तसेच यशस्वी (जैस्वाल), (संजू) सॅमसनसह (जोस) बटलर आहे, ज्यांना आम्ही कायम ठेवले.

संगकारा पुढे म्हणाला, आमच्याकडे प्रत्येक विभागात खोली आहे. जसे की, जेम्स नीशम, मिशेल आणि रेसी व्हॅन डर डसेन हे चांगले क्रिकेटपटू आहेत. त्याचबरोबर आमच्याकडे काही चांगले युवा खेळाडू देखील आहेत. महत्वाचे म्हणजे आमच्याकडे टीम खुप सक्षम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.