ETV Bharat / sports

Cricketer Cheteshwar Pujara : भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पुजाराचे मोठे वक्तव्य; आयपीएलमध्ये खरेदी...! - Indian Test team

चेतेश्वर पुजाराची श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली नव्हती. त्याची कसोटी कारकीर्द संपल्याचे दिसत होते. मात्र, कौंटी चॅम्पियनशिपमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर पुजाराने भारतीय संघात पुनरागमन केले आहे. रविवारी बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या एकमात्र कसोटी ( The only Test against England ) सामन्यासाठी भारतीय संघात त्याची निवड केली आहे

Cheteshwar Pujara
Cheteshwar Pujara
author img

By

Published : May 23, 2022, 5:21 PM IST

हैदराबाद: रविवारी बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. ज्यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराला ( Veteran batsman Cheteshwar Pujara ) संधी देण्यात दिली आहे. भारतीय कसोटी संघात निवड झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आपल्या पुनरागमनावर प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने भारतीय संघातून वगळण्यात आल्यानंतर आयपीएलमध्ये ही कोणत्या संघाने खरेदी न करण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अनुभवी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराला इंडियन प्रीमियर लीग ( IPL ) 2022 साठी कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. पुजाराला आयपीएलमध्ये खरेदी न केल्याची खंत नाही. त्याच्या मते हे त्याच्यासाठी वरदान ठरले आहे. पुजाराची श्रीलंकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेसाठी निवड झाली नव्हती. ज्यामुळे त्याची कसोटी कारकीर्द संपल्याचे दिसत होते. मात्र, कौंटी चॅम्पियनशिपमध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर पुजाराने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

आयपीएलमध्ये न खेळणे वरदान ठरले -

भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पुजाराने आयपीएलमध्ये न खेळणे आपल्यासाठी वरदान ठरल्याचे म्हटले आहे. त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले असते, तरी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसती, असे पुजाराचे मत आहे. पुजारा एका वृत्तसंस्थेला बोलताना म्हणाला, ''जरी मला आयपीएलच्या कोणत्या संघाने विकत घेतले असते, तरी मला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसती. फक्त नेटमध्ये जाऊनच सराव करावा लागला असता. नेटमध्ये सराव करणे आणि सामना खेळणे यात मोठा फरक आहे. त्यामुळेच मी काउंटीला हो म्हणालो. मी काउंटीला हो म्हणालो कारण मला माझ्या जुन्या लयीत परत यायचे होते.''

काउंटी चॅम्पियनशिपमध्ये धावांचा पाऊस -

काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमध्ये खेळताना पुजाराने पाच सामन्यांत 120 च्या सरासरीने 720 धावा केल्या त्यात दोन द्विशतकांचा आणि दोन शतकांचा समावेश आहे. याशिवाय पुजाराने 170 धावांची खेळीही खेळली. आता त्याने भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सकारात्मक असल्याचे म्हटले आहे.

पुजारा पुढे म्हणाला, मी पुनरागमनासाठी सकारात्मक होतो यात शंका नाही. मी कौंटीमध्ये ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यामुळे मी भारतीय संघात पुनरागमन करेन, अशी आशा होती. मात्र, मी कौंटी खेळायला गेलो तेव्हा भारतीय संघात परतण्याचा विचार माझ्या मनात आला नव्हता. मला फक्त मोठी खेळी करून माझी लय शोधायची होती.

हेही वाचा - Indian T20 Squad : उमरान मलिकची टीम इंडियात निवड झाल्याने जम्मूमध्ये जल्लोष, उपराज्यपालांनी केले अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.