हैदराबाद : आयपीएल 2022 या स्पर्धेला ( IPL 2022 tournament ) मार्च शेवटच्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात होण्याची शक्यता आहे. तत्पुर्वी या स्पर्धेसाठीचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बंगळुरु येथे पार पडला आहे. या लिलावात भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि मिस्टर आयपीएल हा अलसोल्ड राहिला आहे. त्याला कोणत्याच फेंचायझिंनी बोली लावली नाही. त्यानंतर आता चेन्नई संघाने त्याला एक खास ट्रिब्यूट दिला ( Tribute to Suresh Raina of Chennai ) आहे.
आयपीएल 2022 च्या लिलावात सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. मात्र, तरी देखील कोणत्याही फ्रेंचायझीने त्यांना खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्सनेही त्याच्यासाठी बोली लावली नाही ( CSK did not bid Suresh Raina ). आता चेन्नई सुपर किंग्स संघाने त्याला ट्रिब्यूट दिले आहे. चेन्नई संघाने यासाठी एक ट्विट केले आहे.
-
Super Thanks for all the Yellove memories, Chinna Thala!🥺
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) February 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
#SuperkingForever 🦁 pic.twitter.com/RgyjXHyl9l
">Super Thanks for all the Yellove memories, Chinna Thala!🥺
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) February 13, 2022
#SuperkingForever 🦁 pic.twitter.com/RgyjXHyl9lSuper Thanks for all the Yellove memories, Chinna Thala!🥺
— Chennai Super Kings - Mask P😷du Whistle P🥳du! (@ChennaiIPL) February 13, 2022
#SuperkingForever 🦁 pic.twitter.com/RgyjXHyl9l
चेन्नई सुपर किंग्स संघाने ( Chennai Super Kings ) आपल्या ट्विटमध्ये चिन्ना थालाला ट्रिब्यूट दिले आहे. त्यांनी आपल्या ट्विटरमध्ये सुरेश रैनाने चेन्नई संघासाठी केलेल्या सेवेसाठी आभार मानले आहे. त्याचबरोबर लिहले की, "पिवळ्या जर्सीतल्या अनेक आठवणींसाठी चिन्ना थालाचे सुपर थँक्स."
सुरेश रैनाची आयपीएल कारकीर्द (Suresh Raina IPL career) -
सुरेश रैनाने आपल्या आयपीएल कारकीर्दीत फक्त दोन संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने चेन्नई व्यतिरिक्त गुजरात लायन्स संघाचे (Gujarat Lions team) प्रतिनिधित्व केले आहे. त्याने दोन वर्ष गुजरात लायन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएल स्पर्धेत 205 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 136.76 के स्ट्राइक रेटने 5528 धावा केल्या आहेत. तो आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू आहे. तसेच त्याने आयपीएल स्पर्धेत एक शतक आणि 39 अर्धशतकं केली आहेत.