ETV Bharat / sports

IPL 2022 Updates : सीएसकेच्या अडचणीत मोठी वाढ; दीपक चहर आयपीएलमधून बाहेर पडण्याची शक्यता, हा येणार नवा खेळाडू - TATA IPL 2022

पाठीच्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज दीपक चहरची इंडियन प्रीमियर लीगच्या ( Indian Premier League ) 15 व्या हंगामात खेळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे, ज्यामुळे चेन्नई सुपर किंग्जच्या अडचणीत भर पडू शकते.

Deepak Chahar
Deepak Chahar
author img

By

Published : Apr 12, 2022, 6:01 PM IST

मुंबई: सीएसकेचा मुख्य वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या ( Fast bowler Deepak Chahar ) दुखापतीचा फटका चेन्नई सुपर किंग्स संघाला बसला आहे. कारण सीएसकेने मुख्य वेगवान गोलंदाज दीपक चहरच्या गैर हजेरीत सुरुवातीचे चार सामने गमावले आहेत. त्याचबरोबर हा संघ 10 संघांच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे. तसेच सीएसके संघाच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. गोलंदाज दीपक चहर गंभीर दुखापतीमुळे तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होण्याची ( Chahar ruled out of IPL ) शक्यता नाही.

14 कोटी रुपयांना लिलावात विकत घेतलेला चहर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापूर्वी तंदुरुस्त होईल, असा दावा सुपर किंग्जने नेहमीच केला होता. पण दुखापतीच्या तीव्रतेमुळे तो या स्पर्धेसाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेशन दरम्यान त्याच्या पाठीची दुखापत बळावली ( Deepak Chahar back injury ) आहे . चहर एका महिन्याहून अधिक काळ राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे, जिथे तो फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी गेला होता.

सुरुवातीला असे मानले जात होते की, चहर बहुतेक आयपीएलसाठी पंधराव्या हंगामातून बाहेर ( Chahar ruled out of IPL ) असेल, परंतु त्याच्या जलद रिकव्हरीमुळे, सुपर किंग्सला आशा होती की तो एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पुनरागमन करण्यास सक्षम असेल. या गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूला फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या T20I दरम्यान पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो या सामन्यात त्याचा कोटा (स्पेल) पूर्ण न करता मैदान सोडावे लागले होते. यानंतर चहर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळू शकला नाही. गतवर्षी संघाच्या विजेतेपदात चहरने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

हेही वाचा - Ipl 2022 Updates : गावसकर यांनी ब्रिटीश समालोचकाला ऑन एयर विचारले तुम्ही कोहिनूर भारताला कधी परत करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.