मेलबर्न - बायो बबल विषयी एक संशोधन समोर आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वैद्यकीय तज्ञाच्या अभ्यासानुसार, कठोर जैव सुरक्षित वातावरणात असलेल्या खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे होणाऱ्या समस्यांपासून वाचण्यासाठी संतुलन बनवण्याची गरज आहे.
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या एक रिपोर्टनुसार, सीएचे मानसिक आरोग्य प्रमुख मॅट बर्गिन आणि वैद्यकीय तज्ञ डॉ. जॉन ऑर्चर्ड यांनी ब्रिटिश असोसिएशन ऑफ स्पोर्टस् अँड एक्सरसाइज मेडिसीनसाठी लिहलेल्या लेखात याचा उल्लेख केला आहे.
त्यांनी आपल्या लेखात लिहलं की, प्रतिस्पर्धीला जोडलेल्या तणावाचा खूप मोठ्या काळापर्यंत प्रभाव पडू शकतो. घटना घडल्यानंतर आठवड्याने किंवा काही महिन्यांनंतर देखील नकारात्मक प्रभावाचा अनुभव होऊ शकतो. याची दाट शक्यता आहे. जिद्दीने आव्हान पूर्ण करणाऱ्या खेळाडूंचे नेहमी कौतुक होतं. अशा खेळाडूंना देखील अशा आव्हानाला तोंड द्यावे लागते. त्यांच्यासाठी आपले मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी नविन मार्ग अवलंबावे लागते आणि त्याला विकसीत करणे आव्हानात्मक ठरते.
बायो-बबलशी जोडले गेलेल्या बहुतांश लक्षणांवर उपचार करणे सोपे होऊ शकते. पण खेळाडूंची देखील ही पद्धत सहन करण्याची एक सीमा असते. दोन्ही तज्ञांनी बायो बबलमध्ये खेळाडूंना मानसिक आरोग्याबाबतच्या समस्यांपासून वाचण्यासाठी संतुलन बनवण्यासाठीच्या आवश्यकतेवर जोर देण्यात आला.
बर्गिन आणि ऑर्चर्ड यांनी लिहलं की, या निराशजनक परिस्थितीतून वाचण्यासाठी एक सीमा असावी लागते. खेळाडू आपल्या मानसिक आरोग्यासाठी स्वत: जबाबदार असतो.
कोविड-19 ला खेळापासून दूर ठेवण्यासाठी प्रोटोकॉलच्या संतुलनाची आवश्यकता पाहिजे. यात कठोर नियमावली नसावी. ज्यामुळे खेळाडूंच्या मानसिक आरोग्यावर अधिक प्रभाव पडेल, असे देखील त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.
हेही वाचा - सेहवागने सांगितलं, धोनी मेंटॉर म्हणून कसा भारतीय संघाचा संकटमोचक ठरू शकतो
हेही वाचा - आयपीएल 2021 च्या दुसऱ्या सत्राला आजपासून सुरूवात, मुंबई-चेन्नई आमने-सामने