ETV Bharat / sports

England New Test Captain : ईसीबीची मोठी घोषणा; बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा नवा कर्णधार - Joe Root

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा ( Announcement of new captain ) केली आहे. बोर्डाने बेन स्टोक्सच्या नावाला मंजुरी दिली आहे. आता बेन स्टोक्स इंग्लंड कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार असेल. इंग्लंड संघाच्या कर्णधारपदासाठी अनेक दिवसांपासून बेन स्टोक्सच्या नावाची चर्चा होत होती. अखेर आज व्यवस्थापनाने त्याला मंजुरी दिली आहे. नुकतेच जो रूटने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता.

England
England
author img

By

Published : Apr 28, 2022, 6:38 PM IST

लंदन: स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सची इंग्लंड कसोटी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ( ECB ) गुरुवारी याबाबत माहिती दिली आहे. स्टोक्स फलंदाज जो रूटची ( Joe Root ) जागा घेईल, ज्याने या वर्षी एप्रिलमध्ये कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे बेन स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचा 81 वा कर्णधार ठरला आहे.

31 वर्षीय रूटनंतर स्टोक्सची कर्णधारपदी नियुक्ती ( Ben Stokes appointed captain ) अपेक्षित होती. मार्चमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडने तीन सामन्यांची कसोटी मालिका गमावल्यानंतर रूटने कर्णधारपद सोडले. कसोटी कर्णधार म्हणून स्टोक्सची पहिली कसोटी न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या घरच्या कसोटी मालिकेतील असणार. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होणार आहे.

स्टोक्स म्हणाला, इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याने माझा सन्मान आहे. हा खरा विशेषाधिकार आहे आणि नवीन इनिंग सुरू करण्यासाठी मी उत्साहित आहे. जो रूटने इंग्लिश क्रिकेटमध्ये केलेल्या अप्रतिम कामगिरीबद्दल मला आभार मानायचे आहेत. तो एक लीडक म्हणून ड्रेसिंग रूमचा एक मोठा भाग आहे आणि या भूमिकेत तो माझ्यासाठी महत्त्वाचा सहयोगी राहील.

30 वर्षीय स्टोक्स इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करेल, ज्या संघाने शेवटच्या 17 सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे आणि 2021-23 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकल टेबलमध्ये तळाला आहे. मंगळवारी संध्याकाळी, ईसीबीचे अंतरिम अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इंग्लंड क्रिकेटचे व्यवस्थापकीय संचालक रॉब ( Managing Director of England Cricket Rob ) यांच्या शिफारसीनंतर त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली.

रॉब म्हणाला, बेनला कसोटी कर्णधाराची भूमिका देण्यास मला कोणताही संकोच वाटला नाही. लाल-बॉल क्रिकेटच्या पुढच्या युगात या संघाला पुढे न्यायचे आहे ही मानसिकता आणि दृष्टी त्याने मूर्त स्वरुपात दिली आहे. त्यांनी हे पद स्वीकारले याचा मला आनंद आहे.

कोविड-19 लॉकडाऊननंतर 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने यापूर्वी इंग्लंडचे कर्णधारपद भूषवले होते, जेव्हा रूट त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्माला उपस्थित राहण्यासाठी सामन्याला उपललब्ध नव्हता. गेल्या वर्षी स्टोक्सने पाकिस्तानविरुद्धची मालिका 3-0 च्या फरकाने जिंकली होती.

हेही वाचा - Cricketer Deepak Chahar : वेगवान गोलंदाज दीपक चहर गर्लफ्रेंडसोबत ऋषिकेशमध्ये, सेल्फीसाठी चाहत्यांची धावपळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.