दुबई - आयसीसी टी 20 विश्वकरंडक स्पर्धेचे आयोजन पुढील महिन्यात यूएई आणि ओमानमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण आज करण्यात आले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करत याची माहिती दिली. दरम्यान, बीसीसीआय या स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे.
टी 20 विश्वकरंडक स्पर्धेची सुरूवात 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. या स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यावेळी एच. इ. शेख, नाहयान मुबारक अल नहयान, खालीद अल जरुनी यांच्यासह आयसीसीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
जय शाह यांनी ट्विट करत याची माहिती दिली. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, एच. इ. शेख, नाहयान मुबारक अल नहयान, खालिद अल जरुनी आणि आयसीसीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दुबईत टी 20 विश्वकरंडक स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. अमिरात क्रिकेट भारतासाठी, आगामी टी 20 विश्वकरंडक स्पर्धेमुळे दुसरे घर असल्यासारखं आहे.
-
Launched the @T20WorldCup Trophy with H.E. Sheikh Nahayan Mabarak Al Nahyan, Mr Khalid Al Zarooni and @ICC officials in Dubai. The @EmiratesCricket will be home away from home for @BCCI in the upcoming T20 World Cup #Strongertogether 🇮🇳 🇦🇪 🤝 pic.twitter.com/mPaOZNMNq1
— Jay Shah (@JayShah) September 2, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Launched the @T20WorldCup Trophy with H.E. Sheikh Nahayan Mabarak Al Nahyan, Mr Khalid Al Zarooni and @ICC officials in Dubai. The @EmiratesCricket will be home away from home for @BCCI in the upcoming T20 World Cup #Strongertogether 🇮🇳 🇦🇪 🤝 pic.twitter.com/mPaOZNMNq1
— Jay Shah (@JayShah) September 2, 2021Launched the @T20WorldCup Trophy with H.E. Sheikh Nahayan Mabarak Al Nahyan, Mr Khalid Al Zarooni and @ICC officials in Dubai. The @EmiratesCricket will be home away from home for @BCCI in the upcoming T20 World Cup #Strongertogether 🇮🇳 🇦🇪 🤝 pic.twitter.com/mPaOZNMNq1
— Jay Shah (@JayShah) September 2, 2021
आयसीसीने टी 20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडीची यादी पाठवण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर दिली आहे. यानुसार सर्व संघांना 10 सप्टेंबरपर्यंत आपल्या संघाची घोषणा करावी लागणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय संघाची घोषणा 6 किंवा 7 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
चेतन शर्माच्या अध्यक्षतेखाली निवड समिती भारताच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा 6 सप्टेंबर रोजी करण्याची शक्यता अधिक आहे. या दिवशी भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचा अखेरचा दिवस आहे. दरम्यान, आयसीसीने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी सहभागी संघांना 15 खेळाडू आणि 8 अधिकाऱ्यांना सोबत आणण्याची परवानगी दिली आहे.
हेही वाचा - IND vs ENG: जेम्स अँडरसनने सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला विश्वविक्रम
हेही वाचा - विराटने सचिन-पाँटिगसह दिग्गजांना टाकलं मागे, जाणून घ्या कोहलीची कामगिरी