ETV Bharat / sports

ODI World Cup 2023 : विश्वचषक 2023 साठी बीसीसीआयला भरावा लागणार 963 कोटी रुपयांचा कर, वाचा संपूर्ण प्रकरण - आयसीसी एकदिवसीय विश्वचषक

5 ऑक्टोबरपासून विश्वचषक 2023 सुरू होण्याची शक्यता आहे. या विश्वचषकाच्या आयोजनासाठी बीसीसीआयला महागडी किंमत मोजावी लागणार आहे. यासाठी बीसीसीआयला भारत सरकारला 963 कोटी रुपयांचा कर भरावा लागणार आहे.

ODI World Cup 2023
विश्वचषक 2023 साठी बीसीसीआयला भरावा लागणार 963 कोटी रुपयांचा कर
author img

By

Published : Mar 23, 2023, 10:36 AM IST

नवी दिल्ली : 2023 मध्ये 5 ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला जाऊ शकतो. या विश्वचषकाचे आयोजन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला चांगलेच महागात पडणार आहे. हे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयला भारत सरकारला कर म्हणून मोठी रक्कम भरावी लागणार आहे. एकदिवसीय विश्वचषकासाठी बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. विश्वचषक 2023 कधी सुरू होईल? अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद विश्वचषकाचे वेळापत्रक सुमारे एक वर्ष अगोदर जाहीर करते. मात्र या विश्वचषकाबाबत अद्याप तसे झालेले नाही.

बीसीसीआय आणि आयसीसीमधील वाद : बीसीसीआयने भारत सरकारला 963 कोटी रुपयांचा कर भरल्यानंतर एकदिवसीय विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्याच वेळी, आयसीसीला वर्ल्ड कप 2023 च्या प्रसारणातून सुमारे 4500 कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. या विश्वचषकातून आयसीसीला सुमारे 4500 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. आयसीसी करारानुसार, यजमान देश कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात आयसीसीला कर सूट देतो. पण T20 विश्वचषक 2016 दरम्यान, आयसीसीच्या करारानुसार असे झाले नाही, ज्याचे कारण फक्त बीसीसीआय आणि आयसीसीमधील वाद होता.

200 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागणार : या वादामुळे बीसीसीआयला आयसीसीकडून सेंट्रल पूलकडून मिळालेल्या रकमेतील सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार, 2016 ते 2023 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सेंट्रल पूलमधून सुमारे 3400 कोटी रुपये मिळणार आहेत. या रकमेतून हा कर कापला जाईल. त्याचवेळी, कर विवादाबाबत बीसीसीआयने दावा केला आहे की, तो लवकरच सोडवला जाईल.

पिचच्या रेटिंगचा रिव्ह्यू करण्यासाठी पत्र : कसोटी मालिकेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. मालिकेतील तिसर्‍या कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने चांगले म्हटले नसून खराब म्हटले आहे. आता बीसीसीआयने आयसीसीच्या या निर्णयाविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यांनी आयसीसीला पिचचा रेटिंगचा रिव्ह्यू करण्यासाठी पत्र पाठवले आहे.

हेही वाचा : Suryakumar Yadav Golden Duck Hattrick : सूर्यकुमार यादव ठरला 'गोल्डन डक'चा बळी, ऐश्टन एगारने केले बोल्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.