नवी दिल्ली : देशभरात झपाट्याने वाढणाऱ्या कोविड-19 प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी स्थळांची संख्या कमी करू शकते. मात्र, याबाबत बोर्डाने अद्याप कोणताही औपचारिक निर्णय घेतलेला नाही. भारतीय संघ फेब्रुवारीमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिका ( IndvWI three-match T20 series ) आणि तितक्याच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचे आयोजन करणार आहे.
त्याची सुरुवात 6 फेब्रुवारीला अहमदाबादमधील 50 षटकांच्या सामन्याने होईल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले ( A BCCI official told PTI ) की, "या क्षणी काहीही ठरवले गेले नाही. ही सतत बदलणारी परिस्थिती आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्ही योग्य वेळी निर्णय घेऊ." अहमदाबाद व्यतिरिक्त जयपूर (९ फेब्रुवारी), कोलकाता (१२ फेब्रुवारी), कटक (१५ फेब्रुवारी), विशाखापट्टणम (१८ फेब्रुवारी) आणि तिरुअनंतपुरम (२० फेब्रुवारी)
ही सामने आयोजित करण्याची इतर ठिकाणे आहेत. हे लक्षात घेता बोर्ड तीन ठिकाणी सहा सामन्यांचे आयोजन करु शकते. सध्याच्या वेळापत्रकानुसार, वेस्ट इंडिजच्या संघाला १ फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये आल्यानंतर तीन दिवस एकांतात राहावे लागेल. तसेच बीसीसीआयने इतर सर्व प्रमुख देशांतर्गत स्पर्धा तूर्तास पुढे ढकलल्या ( BCCI has postponed all other major domestic tournaments ) आहेत.