नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया चषकाच्या तयारीत व्यग्र आहे. टीम इंडियाच्या बहुतेक खेळाडूंनी बेंगळुरूला पोहोचल्यानंतर शिबिरात फिटनेस चाचणी देण्यास सुरुवात केली. संघात स्थान मिळवण्यासाठी बीसीसीआयने एक निकष लावला आहे, तो निकष म्हणजे यो-यो चाचणी. ही चाचणी उत्तीर्ण झाल्याशिवाय खेळाडूला संघात स्थान मिळत नाही.
काय आहे यो-यो प्रकरण : शिबिराच्या पहिल्या दिवशी रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंची यो-यो चाचणी घेण्यात आली. हे सर्व खेळाडू चाचणीत उत्तीर्ण झाले. मात्र आता या चाचणीवरून नवा वाद निर्माण झालाय. भारताच्या स्टार खेळाडू विराट कोहलीने ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर सोशल मीडियावर आपला स्कोअर पोस्ट केला. मात्र असे करणे बीसीसीआय कराराच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विराट कोहलीवर आक्षेप घेतलाय. आता या प्रकरणी विराट कोहलीवर कारवाईही होऊ शकते, असं बोललं जातंय.
-
Updates on Team India's Yo-Yo Test:- (PTI)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
•Mandated Yo-Yo parameter - 16.5
•Kohli, Rohit, Hardik & others passed the Test.
•Bumrah, Samson, Tilak, Krishna join team on Friday.
•KL Rahul part of fitness drill but Not Yo-Yo Test.
•Camp is scheduled to conclude on 29th Aug. pic.twitter.com/hwqP4BVWGH
">Updates on Team India's Yo-Yo Test:- (PTI)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 24, 2023

•Camp is scheduled to conclude on 29th Aug. pic.twitter.com/hwqP4BVWGHUpdates on Team India's Yo-Yo Test:- (PTI)

खेळाडूंना गोपनीयतेचा नियम पाळावा लागतो : बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खेळाडूंना सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर गोपनीयतेचा नियम पाळावा लागतो. खेळाडू प्रशिक्षणादरम्यान त्यांचे फोटोज पोस्ट करू शकतो. परंतु त्यांचे कोणतेही अहवाल आणि स्कोअर सोशल मीडियावर अपडेट करू शकत नाही. हे कराराच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते.
-
Updates on Team India's Yo-Yo Test:- (PTI)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
•Mandated Yo-Yo parameter - 16.5
•Kohli, Rohit, Hardik & others passed the Test.
•Bumrah, Samson, Tilak, Krishna join team on Friday.
•KL Rahul part of fitness drill but Not Yo-Yo Test.
•Camp is scheduled to conclude on 29th Aug. pic.twitter.com/hwqP4BVWGH
">Updates on Team India's Yo-Yo Test:- (PTI)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 24, 2023
•Mandated Yo-Yo parameter - 16.5
•Kohli, Rohit, Hardik & others passed the Test.
•Bumrah, Samson, Tilak, Krishna join team on Friday.
•KL Rahul part of fitness drill but Not Yo-Yo Test.
•Camp is scheduled to conclude on 29th Aug. pic.twitter.com/hwqP4BVWGHUpdates on Team India's Yo-Yo Test:- (PTI)
— CricketMAN2 (@ImTanujSingh) August 24, 2023
•Mandated Yo-Yo parameter - 16.5
•Kohli, Rohit, Hardik & others passed the Test.
•Bumrah, Samson, Tilak, Krishna join team on Friday.
•KL Rahul part of fitness drill but Not Yo-Yo Test.
•Camp is scheduled to conclude on 29th Aug. pic.twitter.com/hwqP4BVWGH
टीम इंडियाचे बेंगळुरूमध्ये विशेष शिबिर : भारतीय क्रिकेट संघांचे बेंगळुरू एनसीएमध्ये ६ दिवसांचे विशेष शिबिर सुरू आहे. २४ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या शिबिराच्या पहिल्या दिवशी यो-यो चाचणी घेण्यात आली. फिटनेसचा दर्जा सुधारण्यासाठी ही चाचणी अत्यंत उपयुक्त मानली जाते. भारतीय क्रिकेट संघाचा फिटनेस सुरळीत ठेवण्यासाठी यापूर्वीही अनेकदा ही चाचणी घेण्यात आलीय.
खेळाडू पास झाला नाही तर.. : आगामी आशिया चषक तसेच ऑस्ट्रेलियासोबतची मालिका आणि विश्वचषकासाठी खेळाडूंना पूर्णपणे तंदुरुस्त ठेवण्यासाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान खेळाडूंच्या रक्त तपासणीसोबतच संपूर्ण शरीराची तपासणी करावी लागते. याशिवाय, प्रशिक्षक त्यांची फिटनेसच्या सर्व निकषांवर चाचणी घेतील. या चाचणीत एखादा खेळाडू पास झाला नाही तर त्याला संघात खेळण्यापासून रोखले जाऊ शकते.
हेही वाचा :