मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी क्रिकेटपटू आणि पंचांना मोठी भेट दिली आहे. बीसीसीआयने त्यांच्या पेन्शनमध्ये मोठी वाढ ( Bcci increase pensions former cricketers Umpires ) केली आहे. वाढीव पेन्शन 1 जुलै 2022 पासून लागू होईल. याबाबत बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
-
NEWS 🚨- BCCI announces increase in monthly pensions of former cricketers, umpires.
— BCCI (@BCCI) June 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
READ -https://t.co/wmjylA1sb4
">NEWS 🚨- BCCI announces increase in monthly pensions of former cricketers, umpires.
— BCCI (@BCCI) June 13, 2022
READ -https://t.co/wmjylA1sb4NEWS 🚨- BCCI announces increase in monthly pensions of former cricketers, umpires.
— BCCI (@BCCI) June 13, 2022
READ -https://t.co/wmjylA1sb4
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) म्हणाले, 'आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या आर्थिक हिताची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडू आयुष्यभर खेळाडू राहतात. त्यांचे खेळाचे दिवस संपल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. अंपायर्स देखील अनसंग हिरो आहेत आणि बीसीसीआय त्यांच्या योगदानाची खरोखर कदर करते.
-
“It is mportant that the financial well-being of our former cricketers is taken care of. The players remain the lifeline of the game, it is our duty to be by their side once their playing days are over. The umpires hve been heroes and the BCCI truly values their contribution.”
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">“It is mportant that the financial well-being of our former cricketers is taken care of. The players remain the lifeline of the game, it is our duty to be by their side once their playing days are over. The umpires hve been heroes and the BCCI truly values their contribution.”
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 13, 2022“It is mportant that the financial well-being of our former cricketers is taken care of. The players remain the lifeline of the game, it is our duty to be by their side once their playing days are over. The umpires hve been heroes and the BCCI truly values their contribution.”
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 13, 2022
बीसीसीआयचे मानद कोषाध्यक्ष रन सिंग धुमाळ ( BCCI Honorary Treasurer Run Singh Dhumal ) म्हणाले, "बीसीसीआय आज जे काही आहे ते त्याच्या माजी क्रिकेटपटू आणि पंचांच्या योगदानामुळे आहे. मासिक पेन्शनमध्ये वाढ जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, जे आमच्या माजी क्रिकेटपटूंच्या चांगल्यासाठी एक उत्तम संकेत आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह ( BCCI Secretary Jai Shah ) यांनी ट्विट केले की, "माजी क्रिकेटपटू (पुरुष आणि महिला) आणि सामना अधिकाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ झाल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. सुमारे 900 सदस्य या लाभाचा लाभ घेतील, ज्यामध्ये सुमारे 75% सदस्यांना 100% वाढीचा लाभ मिळेल.
-
I’m pleased to announce an increase in the monthly pension of former cricketers (men & women) and match officials. Around 900 personnel will avail of this benefit and close to 75% of personnel will be beneficiaries of a 100% raise.
— Jay Shah (@JayShah) June 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I’m pleased to announce an increase in the monthly pension of former cricketers (men & women) and match officials. Around 900 personnel will avail of this benefit and close to 75% of personnel will be beneficiaries of a 100% raise.
— Jay Shah (@JayShah) June 13, 2022I’m pleased to announce an increase in the monthly pension of former cricketers (men & women) and match officials. Around 900 personnel will avail of this benefit and close to 75% of personnel will be beneficiaries of a 100% raise.
— Jay Shah (@JayShah) June 13, 2022
पेन्शमध्ये इतकी झाली वाढ -
ज्या खेळाडूंची किंवा पंचांची पेन्शन 15 हजार रुपये होती, त्यांना आता तीस हजार रुपये मिळणार आहेत. ज्यांची पेन्शन 22,500 रुपये आहे, त्यांना 45 हजार रुपये दिले जातील. 30000 रुपये मासिक पेन्शन असलेल्या कर्मचाऱ्यांना 52,500 रुपये दिले जातील. ज्या खेळाडूंना किंवा पंचांना 37,500 रुपये पेन्शन मिळायची त्यांना 60,000 रुपये मिळणार आहेत. याशिवाय पन्नास हजार रुपये मिळणाऱ्या सदस्यांना आता 70 हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.
हेही वाचा - Ipl Media Rights Day 2: एका सामन्यातून 105 कोटींची कमाई, आयपीएल ठरली जगातील दुसरी सर्वात महागडी लीग