ETV Bharat / sports

Jasprit Bumrah : अखेर प्रतीक्षा संपली!, जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन - जसप्रीत बुमराह कर्णधार

बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या हाती टीम इंडियाची कमान देण्यात आली असून मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार बनवण्यात आले आहे.

Jasprit Bumrah
जसप्रीत बुमराह
author img

By

Published : Jul 31, 2023, 9:41 PM IST

मुंबई : दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन झाले. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली. टी-20 मध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाला लीड करणार आहे.

ऋतुराज गायकवाड उपकर्णधार : निवडकर्त्यांनी कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचाही संघात समावेश केला आहे. तर 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. बुमराहने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. मात्र त्यानंतर तो पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाला. त्याच्यावर स्ट्रेस फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

टी 20 विश्वचषक आणि आयपीएलला मुकला : दुखापतीनंतर मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये बुमराहचे पुनर्वसन सुरू झाले. त्याने डिसेंबरमध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. तथापि, जानेवारीमध्ये फिटनेस चाचणी फेल झाल्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले. दुखापतीमुळे बुमराह 2022 मधील आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा आणि २०२३ मधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये भाग घेऊ शकला नाही. मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी तो संघात परतला. मात्र दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने त्याला माघार घ्यावी लागली होती.

बुमराहची अनुपस्थिती जाणवली : गेल्या वर्षभरात बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियाला चांगलीच जाणवली. विशेषत: इंग्लडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये बुमराहचे संघात नसणे भारताला महागात पडले. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारूण पराभव झाला. मात्र आता आगामी वनडे विश्वचषकापूर्वी त्याचे संघात परतणे टीम इंडियासाठी निश्चितच दिलासादायक आहे.

आयर्लंड मालिकेसाठी भारताचा संघ : जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

  • NEWS 🚨- @Jaspritbumrah93 to lead #TeamIndia for Ireland T20Is.

    Team - Jasprit Bumrah (Capt), Ruturaj Gaikwad (vc), Yashasvi Jaiswal, Tilak Varma, Rinku Singh, Sanju Samson (wk), Jitesh Sharma (wk), Shivam Dube, W Sundar, Shahbaz Ahmed, Ravi Bishnoi, Prasidh Krishna, Arshdeep…

    — BCCI (@BCCI) July 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Stuart Broad Retirement : युवराज सिंगने 6 षटकार ठोकलेल्या गोलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, युवी म्हणाला..
  2. ICC World Cup 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी; 'या' तारखेपासून विश्वचषकाच्या तिकिटांची ऑनलाइन विक्री सुरू होणार
  3. Asian Games 2023 : टीम इंडियाला मिळाली थेट क्वार्टरफायनलमध्ये एंट्री! जाणून घ्या कशी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.