ETV Bharat / sports

IND vs SA T20I Series : टी-20 मालिकेसाठी स्टेडियममध्ये 100 टक्के प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता - क्रिकेटचे प्रेक्षक

आयपीएल 2022 ( IPL 2022 ) चा हंगाम संपल्यानंतर लवकरच भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेसोबत पाच सामन्यांची T20 मालिका ( IND vs SA T20 Series ) खेळणार आहे. या मालिकेसाठी परिस्थितीत प्रेक्षक पूर्ण क्षमतेने स्टेडियममध्ये उपस्थित राहू शकतात.

IND vs SA
IND vs SA
author img

By

Published : May 19, 2022, 5:29 PM IST

मुंबई: सध्या आयपीएल 2022 चा हंगाम रोमांचक टप्प्यात आला आहे. या हंगामानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार ( South Africa to tour India ) आहे. बीसीसीआयने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवरील बंदी उठवली आहे. अशा स्थितीत स्टेडियमच्या पूर्ण क्षमतेनुसार म्हणजेच 100 टक्के प्रेक्षक स्टेडियमध्ये उपस्थित राहून सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

यापूर्वी बीसीसीआयने स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीवर बंदी घातली होती. 2020 मध्ये कोरोना महामारीचे आगमन झाल्यापासून, प्रत्येक मालिकेत प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत वेगवेगळे नियम करण्यात आले होते. अनेक सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या येण्यावर पूर्ण बंदी घालण्यात आली होती. यानंतर स्टेडियमच्या क्षमतेनुसार 50 किंवा 75 टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली.

सध्या तरी प्रेक्षकांच्या येण्यावरचे निर्बंध आता पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. मात्र, याप्रकरणी बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की, भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या मालिकेत प्रेक्षक स्टेडियमध्ये जाऊन टी-20 सामन्याचा आनंद घेऊ शकतील.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिका 9 जून ते 19 जून दरम्यान खेळवली जाणार आहे. या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी शिखर धवनला भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. भारताच्या कसोटी संघ 15 किंवा 16 जून रोजी इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. या संघासोबत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडही इंग्लंडला रवाना होणार आहेत. अशा परिस्थितीत एनसीएचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण ( NCA chief VVS Laxman ) यांना भारताच्या टी-20 संघाचे प्रशिक्षक बनवले जाऊ शकते.

विशेष म्हणजे याआधीही धवनने भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताचा ब संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात शिखर धवनने भारताचे नेतृत्व केले आणि एनसीएचे प्रमुख राहुल द्रविड संघाचे प्रशिक्षक झाले. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कसोटी संघासोबत इंग्लंडमध्ये होते.

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना: 9 जून, अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली
  • दुसरा सामना: 12 जून, बाराबती स्टेडियम, कटक
  • तिसरा सामना: 14 जून, वाई. एस रेड्डी स्टेडियम, विशाखापट्टनम
  • चौथा सामना: सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, राजकोट
  • पाचवा सामना: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु

हेही वाचा - Rinku Singh Statement : रातोरात आपल्या खेळीने चर्चेत आलेल्या रिंकु सिंगने सांगितली, पडद्या मागची वेदनादायी कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.