ETV Bharat / sports

IND vs WI 3rd T20 : तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी बीसीसीआयने दिली 20 हजार प्रेक्षकांना परवानगी - तिसऱ्या सामन्यासाठी 20000 प्रेक्षकांना परवानगी

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे प्रमुख अविशेक दालमिया यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की, "तुमच्या विनंतीनंतर, इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी-20 मध्ये प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

IG
IG
author img

By

Published : Feb 17, 2022, 7:51 PM IST

कोलकाता : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना बुधवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता या मालिकेतील दोन सामने खेळले जाणार आहेत. यातील तिसऱ्या सामन्यासाठी बीसीसीआयने प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा टी-20 सामना ( IND vs WI 3rd T20 match ) 20 तारखेला ईडन गार्डनवर खेळला जाणार आहे. या तिसऱ्या सामन्यासाठी 20000 प्रेक्षकांना ( 20000 spectators allowed for third match ) मैदानावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये बहुतेक क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे ( Cricket Association of Bengal ) सदस्य असतील.

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे प्रमुख अविशेक दालमिया ( CAB Chief Avishek Dalmiya ) यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे, "तुमच्या विनंतीनंतर, इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर, वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या टी20 सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला." यासाठी सीएबी आपल्या सदस्यांना आणि मान्यताप्राप्त युनिट्सना मोफत तिकिटे जारी करेल.

अविशेक दालमिया म्हणाले ( Avishek Dalmiya said about BCCI ) , ''आम्ही बीसीसीआयचे आभारी आहोत. हे सीएबीला आजीवन सहयोगी, वार्षिक आणि मानद सदस्यांप्रती आपली जबाबदारी पार पाडण्यास सक्षम करेल." या अगोदर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाले होते की, खेळाडूंच्या आरोग्याला धोका होऊ नये म्हणून प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.

दालमिया यांनी ७० टक्के प्रेक्षकांना प्रवेश देण्याची विनंती केली होती. पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये, सुमारे 2000 प्रेक्षकांना कॉर्पोरेट बॉक्स आणि डॉ. बी. सी. रॉय क्लब हाऊसच्या वरच्या स्तरावर प्रवेश देण्यात आला आहे. पहिल्या दोन सामन्यांचे मॅच पास फक्त प्रायोजकांसाठी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.