ETV Bharat / sports

बांगलादेशच्या सौम्य सरकारनं मोडला सचिन तेंडुलकरचा १४ वर्ष जुना विक्रम - सचिन तेंडुलकर

Soumya Sarkar : महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा १४ वर्ष जुना विक्रम मोडीत निघाला आहे. हा विक्रम बांगलादेशचा डावखुरा फलंदाज सौम्य सरकारनं मोडला. काय होता हा विक्रम, जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी.

Soumya Sarkar
Soumya Sarkar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 4:42 PM IST

न्यूझीलंड Soumya Sarkar : बांग्लादेशची क्रिकेट टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. येथे ते ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळतील. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, बांगलादेशचा सलामीवीर सौम्य सरकारनं १५१ चेंडूत १६९ धावा करत कारकिर्दीतील सर्वोत्तम धावसंख्या उभारली. त्याच्या या खेळीच्या बळावर बांगलादेशनं ४९.५ षटकांत २९१ धावा रचल्या.

घराबाहेर केलेली सर्वोच्च धावसंख्या : आपल्या या खेळी दरम्यान सौम्य सरकारनं महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा १४ वर्ष जुना विक्रम मोडला. या ३० वर्षीय खेळाडूची ही शतकी खेळी बांगलादेशी पुरुष खेळाडूनं वनडे क्रिकेटमध्ये घरापासून दूर केलेली आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. आपल्या या खेळीत सौम्यनं २२ चौकार आणि २ षटकार ठोकले.

सचिनचा हा विक्रम मोडला : बांग्लादेशच्या सौम्य सरकारची ही खेळी न्यूझीलंडमधील एकदिवसीय सामन्यांमध्ये उपखंडातील खेळाडूनं केलेली सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यानं न्यूझीलंडविरुद्ध सचिन तेंडुलकरच्या नाबाद १६३ धावांच्या विक्रमाला मागे टाकलं. यासह २९१ ही ही बांगलादेशची न्यूझीलंडमधील वनडेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. झिम्बाब्वेविरुद्ध लिटन दासच्या १७६ धावांच्या खेळीनंतर डावखुऱ्या सौम्य सरकारची ही खेळी आता वनडेत बांगलादेशींची दुसरी सर्वोत्तम खेळी आहे.

बांगलादेशचा पराभव : सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेली बांगलादेशची टीम संकटात सापडली होती. १० षटकांतच त्यांनी आपल्या पहिल्या तीन विकेट गमावल्या. यानंतर सौम्य सरकारनं धुरा सांभाळत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेलं. त्याच्या खेळीच्या जोरावर पाहुण्या संघानं प्रथम फलंदाजी करताना सर्व गडी गमावून २९१ धावा केल्या. मात्र, प्रत्युत्तरात न्यूझीलंडनं केवळ ३ गडी गमावून हे लक्ष्य सहज गाठलं. यासह किवीजनं तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

हे वाचलंत का :

  1. IPL २०२४ Auction : 'हा माझ्या कारकिर्दीतील नवीन टप्पा'; लिलावात हैदराबादनं खरेदी केलेल्या जयदेव उनाडकटचा ETV Bharat सोबत खास संवाद
  2. जे धोनीलाही जमलं नाही ते ऋषभ पंतनं केलं! आयपीएलच्या लिलावात बसताच रचला इतिहास; 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार
  3. IPL २०२४ Auction : स्टार्क-कमिन्ससह 'या' अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना मिळाली विक्रमी किंमत, अनेक दिग्गज खेळाडू अनसोल्ड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.